रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ ; IMA कडून १ हजार कोटींचा मानहानी दावा..

रामदेव बाबांना अॅलोपथीचे ज्ञान नाही तरीही ते डॉक्टर विरुध्द वादग्रस्त विधाने करीत आहेत.
Sarkarnama Banner - 2021-05-26T151806.300.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-26T151806.300.jpg

मुंबई : अॅलोपथी औषध, आणि डॉक्टरांवर टीका करून डॉक्टरांना २५ प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान करणाऱ्या योगगुरु रामदेव बाबा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उत्तराखंडच्या इंडिअन मेडिकल असोसिएशन शाखेकडून (IMA) रामदेव बाबांवर १ हजार कोटींचा मानहानी दावा करण्यात आला आहे. आयएमएने रामदेव बाबांना याबाबतची नोटीस पाठविली आहे.  ima send rs 1000 cr defamation notice to ramdev Baba

असोसिएशनचे सचिव डॉ. अजय खन्ना म्हणाले की, रामदेव बाबांना अॅलोपथी मधले अ सुद्धा माहिती नाही. आम्ही त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ पण त्यापूर्वी त्यांनी आपली योग्यता सिध्द करावी. आम्ही रामदेवबाबांना १५ दिवसाची मुदत दिली आहे. या वेळात त्यांनी केलेल्या विधानांबद्दल माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहोत.

रामदेवबाबांना अॅलोपथीचे ज्ञान नाही तरीही ते डॉक्टर विरुध्द वादग्रस्त विधाने करीत आहेत. करोना काळात रात्रदिवस रुग्णसेवेत असलेल्या डॉक्टर्सचे मनोबल त्यामुळे कमी होत आहे.

आजार आणि उपचार या बाबत बाबा नेहमीच अवैद्यानिक दावे करतात. कॅन्सरवर उपचाराचा दावा सुद्धा ते करतात. असे असेल तर त्यांना नोबेल मिळायला हवे, असे डॅा. अजय खन्ना यांनी म्हटलं आहे. कोरोना काळात असली विधाने करणाऱ्या बाबांवर सरकारने महामारी कायद्यानुसार कारवाई करायला हवी, अन्यथा आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत, असे खन्ना म्हणाले

नवी दिल्ली : दोन दिवसापूर्वी पतंजली आयुर्वेदचे सर्वेसर्वा योगगुरु रामदेव बाबा  Ramdev Baba यांनी  व्हॅाट्सअॅपरील एक मेसेज वाचून दाखवताना त्यांनी अॅलोपॅथी उपचार पध्दतीला फालतू म्हटले होतं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली. आता पुन्हा रामदेव बाबांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) विरोधात वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे. त्यांच्यावर नेटकऱ्यांनी हल्लाबोल केला आहे.  काही ठिकाणी डॅाक्टरांनी पतंजलीच्या विरोधात आंदोलन केले आहे. सोशल मीडियावर रामदेव बाबा यांच्याविरोधात मोहिम सुरु आहे. त्यांना अटक करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. या दरम्यान सोशल मीडियावर रामदेव बाबा यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरही टीका होत आहे. आयएमएने त्यांनी अटक करण्याची मागणी केली आहे, त्यावर प्रतिक्रिया देताना रामदेव बाबांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, त्यांचा बापही मला अटक करु शकत नाही.नेटकऱ्यांनी त्यावर हल्लाबोल केला आहे, रामदेव बाबा सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. एक युजर्स म्हणतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रामदेव बाबा यांची जवळीक असल्याने ते अशा प्रकारचे विधान करीत आहेत.  
Edited by : Mangesh Mahale  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com