तुझ्यात हिम्मत असेल तर शेतकरी आंदोलनात येऊन दाखव, या अभिनेत्रीने कंगनाला दिले चॅलेंज 

पंजाब तसेच बॉलिवूडमधील कलाकारांनीही दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे
 तुझ्यात हिम्मत असेल तर शेतकरी आंदोलनात येऊन दाखव, या अभिनेत्रीने कंगनाला दिले चॅलेंज 

नवी दिल्ली : मोदी सरकारने आणलेले नवी कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशभरातून पाठिंबा वाढत आहे. मोदी सरकारही शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या तरी मार्ग निघत नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मंत्र्यांशी चर्चा केली हे आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. 

पंजाब तसेच बॉलिवूडमधील कलाकारांनीही दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका घेत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना राणावत हिने मोदी सरकारची बाजू घेत शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका केली आहे. कंगना ही शेतकरी असो की मुंबई पोलिस टीका करण्यास मागेपुढे पाहत नाही. मुंबईला पीओके म्हणणाऱ्या कंगनाला शिवसेनेने जसे सुनावले होते तसे पंजाबमधील एक अभिनेत्रीनेही तिला खुले आव्हान दिले आहे. 

जर तुझ्यात हिम्मत असेल तर जेथे शेतकरी आंदोलनाला बसले आहेत तेथे येऊन दाखव असे म्हटले आहे. पंजाबमधी त्या अभिनेत्रीचे नाव जापजी खैरा असे आहे. तिने कंगनाला खुले आव्हान देताना म्हटले आहे, की दिल्लीत शेतकरी आंदोलनात जसे पुरूष आहेत तसेच महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. जर कंगनामध्ये हिम्मत असेल तर तिने येथे यावे आणि आंदोलनात सहभागी असलेल्या महिलांशी चर्चा करावी.

आपण सर्वानी एकत्र राहावे. आपणामध्ये फुट पाडण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर आपण सावध राहिले पाहिजे. माझे सगळे वडीधारी मंडळी आंदोलन करीत आहेत. त्यांना माझा पाठिंबा आहे. आपली एकजूट अशीच राहिली पाहिजे असेही तिने म्हटले आहे. महिलांशी चर्चा करताना जेव्हा कंगनाचा विषय निघाला तेव्हा खैरा हिने कंगनाचा समाचार घेत दिल्लीतील शेतकरी आंदोलनात येऊन दाखव असे आव्हान दिले. 

रितेश देशमुखचा पाठिंबा 
दरम्यान, दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मुळ शेतकरीच असलेल्या अभिनेता रितेश देशमुख यांने पाठिंबा दिला आहे. त्यांने केलेल्या आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की आपण जे आज अन्न खात आहोत त्या बदल्यात एका शेतकऱ्याला धन्यवाद दिले पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com