पवारांनी सरकारला मार्गदर्शन केले, तर फडणवीसांच्या पोटात दुखायचे कारण काय? 

पाप आणि पुण्याची परिभाषा देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना समजावू नये.
If Sharad Pawar guided the government, what is the reason for Fadnavis' stomach ache?
If Sharad Pawar guided the government, what is the reason for Fadnavis' stomach ache?

मुंबई : महाविकास आघाडीचे शिल्पकार, ज्येष्ठ नेते शरद पवार राज्य सरकारला मार्गदर्शन करत असतील, तर पोटात दुखायचे कारण काय? असा थेट सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. 

"कर्ज काढणे हे पाप नाही, परंतु राज्याचा जीएसटीचा हक्काचा 28 हजार कोटींचा परतावा राज्याला न देणे हे निश्‍चितच पाप आहे. हक्काचा परतावा राज्याला परत मिळण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रयत्न करणार का? आणि केले का,' असा सवाल महेश तपासे यांनी फडणवीस यांना केला. पाप आणि पुण्याची परिभाषा देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना समजावू नये, असा सल्लाही तपासे यांनी या वेळी दिला. 

गुजरातमध्ये भूकंप झाला, त्या वेळी गुजरात व केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. तरीसुद्धा भूकंप पीडितांना मदत करू शकले नाहीत. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्या वेळी आपत्ती व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शरद पवार यांना केले होते, तो सरकारचा नाकर्तेपणा होता का? असा खोचक सवालही तपासे यांनी केला. 

देशात अनेक कृषिमंत्री झाले; मात्र एकमेवाद्वितीय कृषिमंत्री शरद पवार राहिले आहेत. ज्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झाला. यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल, ते महाविकास आघाडी करेल, याची आठवणही महेश तपासे यांनी फडणवीस यांना करून दिली आहे. 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस 

शरद पवारांसारखा जाणता नेता या राज्यात नाही. पण सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे ते राज्याचा बचाव करताहेत. राज्याचा बचाव होईल, एवढेच ते बोलत आहेत, असा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद येथे काढला. 

फडणवीस म्हणाले, "काही झाले की केंद्राकडे टोलवायचे असे चालले आहे. पवार साहेबांनी सांगितले की मदत मिळायला एक दीड महिना जाईल. केंद्राची मदत कधी येते, याची कल्पना पवारसाहेबांना आहे. केंद्रात समितीचे प्रमुख गृहमंत्री व सदस्य कृषीमंत्री असतात. पहिल्यांदा राज्य सरकारला अंदाज द्यावा लागतो. नंतर टीम येते व ती केंद्राला रिपोर्ट सादर करते. ही अनेक वर्षांची पद्धत आहे. जेव्हा पवार कृषिमंत्री होते, तेव्हाही हीच पद्धत होती. आजही आहे,'' 

"शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आवश्‍यकता असेल तर कर्ज काढले पाहिजे, असा सल्ला पवार यांनी दिला आहे. कर्ज काढणे म्हणजे खूप मोठे पाप नाही. 1 लाख 20 हजार कोटींचे कर्ज आपल्याला काढता येते. आपण आतापर्यंत 60 हजार कोटींचे कर्ज घेतले आहे, त्यामुळे कर्ज घेऊन आता मदत केली तर नंतर केंद्राकडून निधी येणारच आहे,' असे फडणवीस यांनी म्हटले होते. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com