घोटाळ्याचे आरोप सिद्ध केले नाहीत तर, ईडीच्या कार्यालयासमोर जोड्यानं मारू : संजय राऊत

विरोधकांच्या जीवाशी खेळावं किंवा त्यांच्याशी सूडबुद्दीने वागावं असा ट्रेन्ड सध्या राष्ट्रीय राजकारणात सुरु आहे. अशा प्रकारची भावना आणि भूमिका उद्धव ठाकरे सरकारची आहे असं कोणीही म्हणू शकणार नाही."
sanjay raut .jpg
sanjay raut .jpg

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी आज ईडीनं चौकशीसाठी पुन्हा एकदा बोलावलं आहे. अशातच राऊत यांच्यावर केलेले आरोप सिद्ध केले नाहीत, तर आरोप करणाऱ्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जोड्यानं मारू असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राऊत म्हणाले की, "राज्यातील नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याबाबत कोणतंही राजकारण करण्यात आलं, असं मला वाटत नाही. कारण आमचीही सुरक्षा व्यवस्था यापूर्वी काढलेल्या आहेत. त्यावेळी आम्ही कधी बोंबललो नाही. मागील सरकारच्या काळात आम्ही सरकारमध्ये असतानाही माझी सुरक्षा काढून घेतली होती, पण मी एका शब्दानं तक्रार केली नाही.

सरकारी यंत्रणांची एक कमिटी असते, त्यामध्ये महत्वाची लोकं असतात, ते निर्णय घेत असतात. महाराष्ट्राचं सरकार जागरुक आणि संवेदनशील आहे. विरोधकांच्या जीवाशी खेळावं किंवा त्यांच्याशी सूडबुद्दीने वागावं असा ट्रेन्ड सध्या राष्ट्रीय राजकारणात सुरु आहे. अशा प्रकारची भावना आणि भूमिका उद्धव ठाकरे सरकारची आहे असं कोणीही म्हणू शकणार नाही."

आरोप सिद्ध करा नाहीतर जोड्यानं मारु 

संजय राऊत बोलतना म्हणाले की, "ज्या पद्दतीनं ही मंडळी अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करत सुटले आहेत. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काहीही कागदं फडकावतात आणि आरोप करतात. आमदार प्रताप सरनाईक यांच्याबाबत अनेक आरोप केले.

त्यानंतर काल राज्यातील प्रमुख नेत्यांबाबत, तसेच मी आणि माझ्या कुटुंबियांवरही आरोप केले. यांच्यात हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवावे. नाहीतर मी अब्रुनुकसानीचे खटले वैगैरे ठीक आहे, ते न्यायालयात जाईल. पण हे आरोप तुम्ही सिद्ध करु शकला नाहीत, तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही, तर माझं नाव संजय राऊत नाही. हे मी आधीच सांगितलं आहे." असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

"आम्ही गेली अनेक वर्ष राजकारण, समाजकारणात, पत्रकारितेत अनेक वर्ष काम करताना आम्ही खूप काळजीपूर्वक काम केलंय. तुमच्यासारखे फडतूस लोक आमच्यावरती आरोप करत बसावेत आणि त्याबद्दल एखाद्या पक्षानं वाईट प्रसिद्धी मिळवावी यासाठी राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता आम्ही केली नाही. ठिक आहे, पाहू आम्ही, तुम्हीसुद्धा आहात आणि आम्हीसुद्धा आहोत." ; असं संजय राऊत म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com