सर्वसामान्यांना न चुकता वीजबील मात्र, आदित्य ठाकरेंसह 15 मंत्र्यांच्या बंगल्यांना बिलंच नाहीत ! - However, without paying electricity bills to the poor, the bungalows of 15 ministers including Aditya Thackeray have no bills at all! | Politics Marathi News - Sarkarnama

सर्वसामान्यांना न चुकता वीजबील मात्र, आदित्य ठाकरेंसह 15 मंत्र्यांच्या बंगल्यांना बिलंच नाहीत !

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 सप्टेंबर 2020

बेस्टच्या विद्युत उपक्रमाकडून लॉकडाउनचा काही कालावधी उलटल्यानंर वीज बिलांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यात ग्राहकांना जादा बिले आकारण्यात आल्याच्या अनेक तक्रारीही समोर आल्या.

मुंबई : बेस्टच्या उपक्रमाने लॉकडाउनचा आधार घेत राज्याच्या काही मंत्र्यांच्या बंगल्यांवर काही महिन्यांची वीज बिले न पाठविल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

बेस्टच्या विद्युत उपक्रमाकडून दर महिन्याला वीजग्राहकांना बिले पाठविली जातात. लॉकडाउनमध्ये सर्वसामान्य वीजग्राहकांकडून जादा बिले आकारण्यात आल्याच्या असंख्य तक्रारी उद्भवल्या. परंतु, तशीच तत्परता मंत्र्यांच्या बंगल्यांबाबत का दाखविण्यात आली नाही, असा प्रश्न माहिती अधिकारातून उपलब्ध झालेल्या उत्तरानंतर निर्माण झाला आहे. 

बेस्टच्या विद्युत उपक्रमाकडून लॉकडाउनचा काही कालावधी उलटल्यानंर वीज बिलांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यात ग्राहकांना जादा बिले आकारण्यात आल्याच्या अनेक तक्रारीही समोर आल्या. त्यावरून गोंधळ निर्माण झालेला असतानाच बेस्टकडून राज्याचे मंत्री तसेच राज्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बिले न पाठविल्याचे समोर आले आहे. 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे राज्यातील मंत्री, राज्यमंत्र्यांच्या बंगल्यावर वीज बिले पाठविण्यात आल्याबाबत माहिती अधिकाराअंतर्गत मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै अशा चार महिन्यांच्या कालावधीतील तपशिल मागितला होता. 

त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागास करोना साथीमुळे ही बिले मिळालेली नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. पैकी पाच मंत्र्यांच्या बंगल्याची मागील पाच महिन्याची बिले प्राप्त झालेली नाहीत. दादा भुसे, के. सी. पाडवी, अमित देशमुख, हसन मुश्रीफ, संजय राठोड यांच्या बंगल्याचा समावेश आहेत. तर ज्या मंत्र्यांच्या बंगल्यांची गेल्या चार महिन्यांची बिले मिळालेली नाहीत, त्यात आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, वर्षा गायकवाड, गुलाबराव पाटील, संदीप भुमरे, अनिल परब, बाळासाहेब पाटील यांच्या बंगल्याचा समावेश आहे. 

हे ही वाचा : 
शिक्षकांच्या माथी अहवालाचे ओझे
विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना दर आठवड्याला शिकवणीचा अहवाल द्यावा लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी केलेल्या प्रयत्नांचा हा अहवाल असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला (एमएससीईआरटी) सादर करावा लागणार आहे.

राज्यातील बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळा, शिक्षक करत असलेल्या प्रयत्नांची माहिती केंद्र सरकार तसेच इतर राज्यांसोबत होणाऱ्या बैठकीत सादर करण्यासाठी एमएससीईआरटीने ही माहिती मागवली आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, माध्यमाच्या बारावीपर्यंतच्या शिक्षकांकडून हा अहवाल मिळणे अपेक्षित असल्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले.

दर आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी शिक्षकांनी आपला अहवाल सादर करायचा आहे. एमएससीईआरटीने दिलेल्या या सूचनांमुळे शिक्षक वर्गात नाराजी पसरली आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे आधीच कामाचा व्याप वाढला आहे. त्यातच कोरोनाची टांगती तलवार ही डोक्‍यावर आहे. त्यात भर म्हणून आणखी एका अशैक्षणिक कामाचा बोजा शिक्षकांच्या खांद्यावर टाकल्याचे बोलले जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख