नेते, सेलिब्रिटींकडे लोकांना वाटण्यासाठी रेमडेसिविर कुठून येते ?.. न्यायालयाने सरकारला खडसावले..

कोरोना संकटाच्या काळात कोणालाही रॉबिनहूड बनण्याची गरज नाही.
Sarkarnama Banner - 2021-05-28T170754.748.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-28T170754.748.jpg

मुंबई : "रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी औषध दिले नाही, तर नेते आणि सेलिब्रिटींकडे हे औषध लोकांना वाटप करण्यासाठी कसे आणि कुठून येते?" असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. "सरकार रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहे," असा सवाल उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला.how does leaders and celebrities gets remdesivir to distribute to the people this should be investigated high court

मुंबई उच्च न्यायालयात आज न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर राज्यातील म्युकरमायकोसिसच्या परिस्थितीसह कोरोनासंबंधित विविध याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी हा प्रश्न विचारत याचा तपास व्हायला पाहिजे, असे न्यायालयाने सरकारला खडसावले. कोरोना संकटाच्या काळात कोणालाही रॉबिनहूड बनण्याची गरज नाही. सध्या राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा नसल्याचे उत्तर यावेळी राज्य सरकारने दिले.

"आमचा लोकांना मदत करण्यावर आक्षेप नाही, परंतु मदत योग्य माध्यमातून व्हायला हवी. ज्यांना मदत करायची आहे, ते सरकारच्या माध्यमातून करु शकतात," असे न्यायालयाने सांगितले. 
राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी म्हणाले की, याबाबतचा खुलासा आमदार झिशान सिद्दिकी आणि एका सेवाभावी संस्थेमार्फत आलेला आहे. त्यांनी या औषधाचा साठा केलेला नाही किंवा विकतही घेतलेले नाही. ते केवळ गरजूंना रेमडेसिवीर सहज कसे उपलब्ध होईल यातील दुवा म्हणून काम करत आहेत. हे कसे शक्य आहे? तुम्ही हे स्पष्टीकरण स्वीकारले आहे का?” असा सवाल उच्च न्यायालयाने विचारल्यानंतर, नाही, आम्ही याची शहानिशा करत आहोत. याबाबत संबंधितांना नोटीस पाठवली असल्याचे उत्तर राज्य सरकारने दिले आहे.
 
हेही वाचा : रेशनिंग दुकानावर दारू वाटायला पण ठाकरे सरकार मागे पुढे पाहणार नाही..भाजपचा टोला 

पुणे :  अनेक दिवसांपासून चंद्रपूरमध्ये Chandrapurदारुबंदी करण्यात आली होती. मात्र, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही बंदी उठवण्यात आली. या निर्णयावरुन भाजप नेत्यांची महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. माळशिरसचे आमदार राम सातपूते Ram Satpute यांनी टि्वट करीत ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.  आमदार राम सातपुते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, दारुबंदी  उठवून  गुन्हेगारी कमी होईल असा जावई  शोध या ठाकरे सरकारने लावला आहे . येत्या काळात रेशनिंग दुकानावर दारू वाटायला पण हे सरकार मागे पुढे पहाणार नाही ..!  चंद्रपूरमधील दारुबंदी उठविण्याच्या निर्णयानंतर काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, “दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती. दारूबंदी उठविण्यासाठी अडीच हजार निवेदने दिली होती" असे म्हणत त्यांनी सरकारच्या या निर्णयाचे समर्थन सुद्धा केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com