बॉलिवूडला गटार कसे काय म्हणता ! सुनील शेट्टीचा कंगनाला टोला  - How do you call Bollywood a gutter! Sunil Shetty attack Kangana | Politics Marathi News - Sarkarnama

बॉलिवूडला गटार कसे काय म्हणता ! सुनील शेट्टीचा कंगनाला टोला 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

एकंदर कंगना बॉलिवूडविरोधात जे काही बोलत आहे किंवा आरोप करीत आहे ते काहीमंडळींना पटत नाहीत. जया बच्चन यांच्यापाठोपाठ आता सुनील शेट्टी यांनीही बॉलिवूडची बाजू घेतली आहे.

मुंबई : दोन चार लोक वाईट असले म्हणून संपूर्ण बॉलिवूडला दोष देणं योग्य नाही आणि बॉलिवूडला चक्क गटार सारखं नाव देणं हे माझ्या सारख्या अभिनेत्याला मान्य नाही असे परखड मत व्यक्त करीत ज्येष्ठ अभिनेते सुनील शेट्टी यांनी अभिनेत्री कंगना राणावतला थेट टोला लगावला आहे. 

अभिनेत्री कंगना राणावत हिच्यानंतर काही दिवसापूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार रुपा गांगुली यांनीही मुंबई पोलिसांना लक्ष्य केले आहे. मुंबई फिल्म इंडस्ट्री लोकांचे जीव घेत आहे. त्यांना ड्रग ऍडिक्‍ट बनवित आहे. महिलांचा अपमान होत असताना मुंबई पोलीस का शांत आहेत असा सवाल केला होता. सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणानंतर कंगनाने बॉलिवूडला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. 

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनीही बॉलिवूडची बाजू घेत जेथे आपण करिअर करता त्यालाच दोष देऊ नका. बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी कट रचला जात असल्याचे राज्यसभेत सांगितले होते. मात्र बच्चन यांनी तळमळ लक्षात न घेता त्यांच्यावर आरोप करण्यात आले आणि तेथेही कंगना आघाडीवर होती. कंगनाचे आरोप करणे आणि ट्विट करणे आजही थांबले नाही. 

एकंदर कंगना बॉलिवूडविरोधात जे काही बोलत आहे किंवा आरोप करीत आहे ते काहीमंडळींना पटत नाहीत. जया बच्चन यांच्यापाठोपाठ आता सुनील शेट्टी यांनीही बॉलिवूडची बाजू घेतली आहे. ते म्हणाले, की मी आजपर्यंत 120 चित्रपट केले आहे. मला तरी बॉलिवूडचा चांगलाच अनुभव आहे. दोन चार मंडळी वाईट आहेत म्हणून सर्वांनाच दोष देऊन कसे चालेल. अगदी गटार म्हणता हे बरोबर नाही असे सांगत त्यांनी कंगना समाचार घेतला. 

बॉलिवूड पाच हजार लोकांना रोजगार देते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, की ड्रग्ज तर नव्हे तर कोणतेच व्यसन करू नये अशी माझी भूमिका आहे. कोणत्याही व्यसनाने शेवटी शरीराची हाणीच होत असते. बॉलिवूडमध्ये जर ड्रग्जचे कनेक्‍शन असेल तर ती साखळी मोडून काढायला हवी. जे कोणी ड्रग्ज पुरवठा करतात ते रॅकेट उद्धवस्त केल्यास अशा घटना घडणारच नाहीत. ड्रग्ज सहज कसे काय मिळते. खरेतर गुड विल आपण सर्वांनीच जपले पाहिजे असेही शेट्टी यांनी म्हटले आहे. 

ड्रग्जप्रकरणी दिपिका, सारा, श्रद्धाची चौकशी 
ड्रग प्रकारणातल्या चौकशीसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण साडेसहा दहा मिनिटे असताना म्हणजेच 10.20 ला नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्युरोच्या गेस्ट हाउसला पोचली. वास्तविक तिने माध्यम प्रतिनिधींना टाळायचे होते. त्यामुळे तिने तसा चकवा पत्रकारांना देण्याचा प्रयत्न केला पण, काही प्रतिनिधींनी तिला गाठण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तिला तातडीने कार्यालयात घेतले. 

बॉलीवूडमध्ये डग्ज घेणारे अनेक कलाकार आहेत आणि त्यांच्या ड्रग्जशिवाय पार्टी होत नाहीत असे आरोप आणि व्हिडिओही पुढे आले आहेत. त्यामुळे एनसीबी काही अभिनेत्रींची चौकशी करीत आहेत. आज सकाळी साडेदहा वाजता दिपिका पदुकोण एनसीबी कार्यालयात पोचली आहे. तिच्याबरोबरच सारा अली खानही यांचीही चौकशी होणार आहे. या सर्व मुद्याच्या पार्श्वभूमी सुनील शेट्टी बोलत होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख