जितेंद्र आव्हाड भेटताच शरद पवारांनी विचारलं, त्या कामाचं काय झाल? - Housing Minister Jitendra Awhad meet Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

जितेंद्र आव्हाड भेटताच शरद पवारांनी विचारलं, त्या कामाचं काय झाल?

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 10 मे 2021

त्या संदर्भात आव्हाड यांनी एक ट्वीट केले आहे. 

मुंबई : मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात (Tata Cancer Hospital) देशभरातून हजारो रुग्ण येतात. त्यांच्यातील अनेकांना निवासाची सोय नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रस्त्यावर, फूटपाथवर रात्र काढावी लागते. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad) यांच्या संकल्पनेतून 'म्हाडा'ने त्यांचे 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेतला आहे. आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली तेव्हा पवार यांनी त्यांना त्या प्लॅट्सचे काय झाले हा प्रश्न विचारला. (Housing Minister Jitendra Awhad meet  Sharad Pawar)

त्या संदर्भात आव्हाड यांनी एक ट्वीट केले आहे. ते म्हणाले की ''काल अचानक साहेबांची भेट झाली. त्यांनी पहिला प्रश्न विचाराला... कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना जी घरे द्यायची होती त्याच काय झाले. मी उत्तर दिले कि साहेब घरे तयार आहेत. चाव्या देखील हातात आहेत. फक्त त्या त्यांना द्यायच्या आहेत. मग म्हणाले उशीर कशाला. मी म्हटले आपल्या तारखेची वाटत पाहतोय. साहेब म्हणाले ठिक आहे. ह्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम करूयात, पहिले त्यांना घरे दिली पाहिजेत, ट्वीट करुन आव्हाड यांनी हा प्रसंग सांगितला आहे.

हे ही वाचा : फडणवीसांनी मराठा समाजाची फसवणूक केली...

शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ते राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले नाहीत. आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते त्यांच्या कामाला पहिल्यासारखी सुरुवात करतील, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले होते. जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी यांच्याकडे कॅन्सर पिडीतांच्या नातेवाईकांच्या व्यवस्थेसाठी टाटाला देण्यात येणाऱ्या खोल्याबाबतची विचारपूस केली. 

Good News : परिस्थिती सुधारतेय; बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट....
 

कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी मानवतेच्या दृष्टीने म्हाडाचे 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर सेंटरला देत आहोत. पुढे ही संख्या 200 होईल. प्लॅट्स देण्याचा विचार आणि निर्णय ही संपूर्ण प्रक्रिया 7 दिवसांत झाली याचा गर्व असल्याचे आव्हाड यांनी सांगितले होते. म्हाडाने प्लॅट्सच्या चाव्या दिल्यानंतर आता सर्व जबाबदारी ही टाटा रुग्णालयाची असेल. त्यात कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला होता.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख