इस्रायलसोबत उभे राहणाऱ्यांनी वाजपेयींचे 'हे' भाषण ऐकावे!” आव्हाडांनी शेअर केला व्हिडिओ! - Housing Minister Jitendra Awhad criticizes the central government | Politics Marathi News - Sarkarnama

इस्रायलसोबत उभे राहणाऱ्यांनी वाजपेयींचे 'हे' भाषण ऐकावे!” आव्हाडांनी शेअर केला व्हिडिओ!

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 16 मे 2021

इस्रायलमध्ये भीषण युद्धपरिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना असलेल्या हमासमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे.

मुंबई : इस्रायलमध्ये (Israel) भीषण युद्धपरिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना असलेल्या हमासमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. गाझा पट्टीमध्ये सुरू असलेल्या रॉकेट हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू होऊ लागले आहेत. इस्रायल सरकार आणि पॅलेस्टिनींमध्ये सुरू असलेला हा संघर्ष अधिकच चिघळत असल्याने भारत सरकार या वादामध्ये घेत असलेल्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. (Housing Minister Jitendra Awhad criticizes the central government)

 या संदर्भात आव्हाड यांनी देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या एका भाषणाची व्हिडिओ क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे. केंद्र सरकारला वाजपेयींचे भाषण ऐकण्याचा सल्ला दिला आहे.

कोरोनाबाधित सर्वाधिक मान्य; पण शेकडो मृतदेह नदीत सोडण्याचे कुकर्म महाराष्ट्राने केले नाही

या ट्वीटमध्ये आव्हाड म्हणाले की, ''आज इस्रायलसोबत उभे राहणाऱ्यांनी आपले पितासमान पंडित अटल बिहारी वाजपेयी यांचे हे भाषण ऐकून घ्यावे.' इस्रायलने आक्रमण करून अरबांच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. त्यांना पॅलेस्टिनींची जमीन सोडावी लागेल'- माजी पंतप्रधान पंडित अटल बिहारी वाजपेयी.''

दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका जुन्हा भाषणाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये वाजपेयींनी इस्रायलविषयी भाजपची भूमिका मांडली आहे.  ''जर भाजपचे सरकार सत्तेत आले, तर ते अरबांची साथ देणार नाही, इस्रायलचा साथ देईल. मोरारजीभाई देसाईंनी हे स्पष्ट केले आहे. असे वाजपेयींनी म्हटले आहे. गैरसमज दूर करण्यासाठी मी हे स्पष्ट करून देऊ इच्छितो की, आम्ही प्रत्येक मुद्द्याला गुण आणि दुर्गुणांच्या बाजूने पाहू.

पण मध्यपूर्वेच्या बाबतीत ही स्थिती स्पष्ट आहे की अरबांच्या जमिनीवर इस्रायलने अतिक्रमण केले आहे, त्यांना ती जमीन सोडावी लागेल. पॅलेस्टिनींच्या अधिकारांची स्थापना झाली पाहिजे. इस्रायलचे अस्तित्व तर अमेरिकेसह आम्हीही मानले आहे. पण मध्य पूर्वेच्या समस्येवर असा तोडगा काढावा लागेल, जो आक्रमण संपुष्टात आणेल आणि शांती प्रस्थापित करेल, असेही त्यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्रातील उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त; शरद पवार

''नवे परराष्ट्रमंत्री याविषयी अधिक माहिती देतील. पण माझा संबंध एका अशा पक्षाशी राहिला आहे की ज्याच्या नावाने निवडणुकीत असे सांगितले जात होते की जनता पक्षावर जनसंघाचा प्रभाव आहे आणि जनसंघ मुस्लिमविरोधी आहे. पण कुणीही या खोट्या प्रचाराला बळी पडलेले नाही'', असे देखील त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. 

आधी पॅलेस्टिनी हमासनं इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला होता. इस्त्रायलच्या 'आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टिम' प्रणालीने १०० हून जास्त क्षेपणास्त्रे आकाशातच निकामी केली. त्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीमध्ये ६०० हून जास्त ठिकाणी हल्ले केल्याची माहिती आहे. अजूनही दोन्ही बाजूंनी हल्ले आणि प्रतिहल्ले सुरूच असून यामध्ये दोन्ही बाजूंकडील जनतेमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख