पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणाऱ्या 18 जिल्ह्यांत होम आयसोलेशन बंद.. टोपेंची सूचना.. - home insulation closed will have to be admitted in covid center rajesh tope | Politics Marathi News - Sarkarnama

पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणाऱ्या 18 जिल्ह्यांत होम आयसोलेशन बंद.. टोपेंची सूचना..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 मे 2021

खबरदारीचा उपाय म्हणून  18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन यंत्रणा कामाला लागली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे  Rajesh Tope यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. कोरोनाची राज्यातील परिस्थिती आणि उपाययोजना याबाबत त्यांनी माहिती दिली. home insulation closed will have to be admitted in covid center rajesh tope

 
कोविड सेंटर (Covid center) वाढवून तिथे आयसोलेशन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी अतिरिक्त कोविड सेंटर उभारले जाणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून  18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन (Home insulation) पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. कोल्‍हापूर, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापुर, अकोला, बुलढाणा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्‍मानाबाद आदी जिल्ह्यात आता होम आयसोलेशन बंद करण्यात आले आहे. 

 

 राजेश टोपे म्हणाले की, 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर आहे.  त्यासाठी लागणार्‍या लसीचे पैसे राज्य सरकार द्यायला तयार आहेत. लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरला राज्याला कोणताही प्रतिसाद नाही. त्यामुळे केंद्राने लशी आयात करावी आणि ती राज्याला पुरवावी. 

कोरोनाचा रिकव्हरी रेट ९३ टक्क्यावर, तर पॉझिटिव्ह रेट १२ टक्क्यावर आला आहे. राज्यातील रुग्णालयांमध्ये फायर ऑडिट झाले नसेल त्या जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत, असे टोपे यांनी सांगितले.  सध्या राज्यात म्युकरमाकोसिसचे 2 हजार 245 रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने याला नोटीफाईड आजार घोषित केला आहे. रुग्ण आणि त्यांच्याबाबतची माहिती सरकारला देणे बंधनकारक आहे, असे टोपे म्हणाले. 

आरोग्यमंत्री  म्हणाले की, म्युकरमायकोसिसच्या आजारासाठी लागणारं एम्फोटेरेसिन इंजेक्शनचं नियंत्रण केंद्र सरकारनं केलेलं आहे. केंद्र सरकार आपल्याला जेवढा कोटा देईल त्याप्रमाणे आपण प्रत्येक जिल्ह्यात त्याचे वाटप करण्यात येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत म्युकर मायकोसिस आजाराचे उपचार मोफत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी बजेटमधून 30 कोटी रुपयांच्या निधीचीही तरतूद करण्यात आला आहे. या आजारावरील उपचारांसाठी 131 रुग्णालयं नोटीफाइड केलेली आहेत. 2200 पैकी 1007 रुग्ण महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर मोफत उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे या आजारावर उपचार खाजगी रुग्णालयात मोफत किंवा कमी दरात करण्याचे प्रयत्नही सुरु आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख