त्यांचे आंदोलन म्हणजे, सुनेने पिठाचा डबा अंगावर ओतून घेण्यासारखा, भाजपची टीका

महागाईमुळे लोकांचे हाल होत असल्याचे कारण देत काँग्रेसतर्फे गेले काही दिवस राज्याच्या प्रमुख शहरांत आंदोलन करण्यात येत आहे. त्यांचा समाचार घेताना देसाई यांनी वरीलप्रमाणे मतप्रदर्शन केले आहे.
Desai.jpg
Desai.jpg

मुंबई : महागाईच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी आंदोलने करणे म्हणजे, पोळ्या करणे जमत नाही म्हणून नव्या सुनेने सासूला कडाकडा बोलत आपल्याच अंगावर पिठाचा डबा रिकामा करण्यासारखे आहे, अशा शब्दांत भाजप महिला मोर्चाच्या मुंबई प्रमुख शीतल गंभीर देसाई (Shital Desai) यांनी काँग्रेसच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.  (His agitation is like pouring a can of gold on his body, BJP's criticism)

महागाईमुळे लोकांचे हाल होत असल्याचे कारण देत काँग्रेसतर्फे गेले काही दिवस राज्याच्या प्रमुख शहरांत आंदोलन करण्यात येत आहे. त्यांचा समाचार घेताना श्रीमती देसाई यांनी वरीलप्रमाणे मतप्रदर्शन केले आहे. आंदोलनाची नाटके करण्याबाबत काँग्रेसला आता केजरीवाल यांचा गुण लागल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

नव्या नवरीने पोळ्या करता येत नाहीत म्हणून सासूला बोल लावत पिठाचा डबा स्वतःच्या अंगावर रिकामा केल्याने काहीच होणार नाही. उलट तिने सासूच्या मदतीने किंवा स्वतःच स्वयंपाक शिकायचा असतो. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीला महागाईसंदर्भात लोकांची इतकीच काळजी असेल तर त्यांनी फक्त केंद्राला दोष देऊ नये. तर त्याऐवजी आपल्याकडून कठोर निर्णय घ्यावेत, मात्र महाविकास आघाडी ते करणार नाही, असेही श्रीमती देसाई यांनी सुनावले आहे.

राज्य सरकारला लोकांबद्दल इतकाच कळवळा आला असेल तर केरळ सरकारने कोविडकाळात जनतेला भरघोस सवलती दिल्या आहेत, तशा सवलती महाविकास आघाडीने राज्यात द्याव्यात. महामुंबईत सरकारने रेल्वे बंद केल्याने नोकरदारांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने एसटी किंवा स्थानिक परिवहन सेवेतील बसचे भाडे-कर कमी करावेत. किंवा लोकांचे हाल अगदीच पहावत नसतील तर निदान कोरोना काळात तरी अत्यल्प दरात किंवा मोफत प्रवास करण्याची सवलत द्यावी. हे उपाय महाविकासआघाडी जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत त्यांना केंद्र सरकारवर टीका करण्याचा काहीही अधिकार नाही. आंदोलनाच्या नाटकासाठी काँग्रेस नेत्यांनी वापरलेल्या सायकली जरी सामान्य नागरिकांना देऊन टाकल्या तरीही लोकांचा मोठाच त्रास वाचेल. नाहीतरी काँग्रेस नेत्यांची सायकलीने फिरण्याची सवय कित्येक दशकांमध्ये मोडली आहे, असाही टोमणा श्रीमती देसाई यांनी मारला आहे.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com