शिवसेनेच्या आमदाराविरोधात जिल्हाप्रमुखांची वरिष्ठांकडे तक्रार 

हर्षल माने व आमदार चिमणराव पाटील यांच्यात वाद आहे.
शिवसेनेच्या आमदाराविरोधात जिल्हाप्रमुखांची वरिष्ठांकडे तक्रार 
Sarkarnama - 2021-09-13T113910.929.jpg

जळगाव : पारोळा येथील शिवसेना आमदार चिमणराव पाटील Chimanrao Patil यांनी केलेले रास्ता रोको आंदोलन आता पक्षांतर्गत वादात आले आहे. या आंदोलनाबाबत पदाधिकाऱ्यांना कोणतीही  माहिती दिली नसल्याची तक्रार जिल्हा प्रमुख हर्षल माने Hershal Mane यांनी वरिष्ठांकडे केली आहे.

शिवसेना आमदार चिमणराव पाटील यांनी महामार्गाच्या निकृष्ट दर्जाचे  कामाबाबत पारोळा येथे शिवसेनेतर्फे आंदोलन केले. मात्र, या आंदोलनात जिल्हा प्रमुख हर्षल माने तसेच अनेक पदाधिकारी हजर नव्हते. विशेष म्हणजे शिवसेनेचे पाचोरा, पारोळा, एरंडोल जिल्हाप्रमुख पारोळा येथेच राहतात, मात्र तेच या आंदोलनात सहभागी नव्हते. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली होती. 

वास्तविक जिल्हाप्रमुख हर्षल माने व आमदार चिमणराव पाटील यांच्यात वाद आहे. त्याचेच प्रतिबिंब कालच्या आंदोलनात जिल्हामध्ये दिसून आले. या बाबत जिल्हा प्रमुख हर्षल माने यांनी सांगितले की, या आंदोलनाबाबत आपल्याला आमदार चिमणराव पाटील यांनी कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे आपण आंदोलनात सहभागी झालो नसल्याचे आपण जिल्हा संपर्क प्रमुख याना  कळविले आहे. वास्तविक आपल्याला कळविण्यास हवे होते त्यामुळे या आंदोलनास व्यापक स्वरूप आले असते. या बाबत आपण वरिष्ठांना जिल्हा प्रमुख  म्हणून सर्व माहिती दिली आहे. त्याबाबत तेच निर्णय घेतील असेही माने यांनी सांगितले.

पुणे लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे देण्याचा प्लॅन ; कॉग्रेस नेत्याचा आरोप
पुणे : पुणे शहर कॉग्रेसच्या अध्यक्षांना पक्षाच्या एका नगरसेवकाने पाठविलेल्या पत्रामुळे कॉग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.  या पत्रात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पुणे लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉग्रेसला NCP सोडण्याचा प्लॅन सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. पक्षाची गोपनीय माहिती भाजपला पुरविली जात असल्याचा गंभीर आरोप या पत्रात करण्यात आला आहे. शहराध्यक्ष रमेश बागवे Ramesh Bagwe यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे.


 

Related Stories

No stories found.