CONTROL ROOM मधून मुख्यमंत्र्यांनी दिले अधिकाऱ्यांना आदेश..

मुंबईतील पाऊस आणि वाहतूक कोंडीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.
Sarkarnaa Banner (6).jpg
Sarkarnaa Banner (6).jpg

मुंबई : काल मध्यरात्रीपासून मुंबई, परिसरात पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनचालक व नागरिकांची तारांबळ होत आहे. रेल्वेरुळावर पाणी साचल्यामुळे मध्य व हार्बर रेल्वेची सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून Control Room मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. त्यापूर्वी त्यांनी मुंबई आणि परिसराची पाहणी केली. Heavy rain in mumbai cm uddhav thackeray took review of situation in mumbai 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महापालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षाला Control Room भेट दिली. दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्यांनी भेट दिली. आजच्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे आणि आयुक्त चहल मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेतला.  त्याबाबत संबंधितांना योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना केली.

अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेतली.  मुंबई महापालिका व संबधित यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी या विभागाकडून मुंबई  व परिसराची माहिती घेतली.  मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही, यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत व जेथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.  

मुंबईतील पाऊस आणि वाहतूक कोंडीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  घेतला. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने करण्यासंदर्भात आणि वाहतूक सुरळीत होईल याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मुंबईत मान्सूनचे आगमन झाले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही, यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत व जेथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील हे पाहण्यास त्यांनी सांगितले.  कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. 

मुंबई महापालिकेने कालच 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबईकरांची दाणादाण उडणार नसल्याचं वाटत असतानाच पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाली आहे. विशेष म्हणजे मुंबईची नालेसफाई 104 टक्के झाल्याचा पालिकेने दावा करून 12 तासही उलटले नाही तोच मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे विरोधकांनी एकच संताप व्यक्त केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com