सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे; १०० कोटींचा दावा दाखल करणार : मुश्रीफ

त्यांच्या सीएच्या पदवीवर शंका यायला लागली आहे.
 Hassan Mushrif, Kirit Somaiya.jpg
Hassan Mushrif, Kirit Somaiya.jpg

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्याचे ग्रामवीकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी १२७ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यावर आता मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे. (Hassan Mushrif criticizes Kirit Somaiya)  

सोमय्या यांच्या आरोपानंतर त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत त्यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटेल आहे. मुश्रीफ म्हणाले, माझ्यावर १२७ कोटींचा आरोप केला आहे. मला त्यांच्या सीएच्या पदवीवर शंका यायला लागली आहे. आम्ही सगळी कागद पत्रे अपलोड करत असतो. आरोप तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहेत. अडीच वर्षापुर्वी ईडीने छापा टाकला होता. त्यामध्ये काही अढळले नाही. आम्ही सगळी उत्तरे दिली आहे. अडीच वर्ष छापा डाकून झाली त्यावर अजून काहीच झाले आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. 

सोमय्या यांनी येवून माहिती घ्यावी. मी त्यांना सागू ईच्छीतो की हजारो शेतकऱ्यांनी या कारखान्यात पैसे गुंतवले आहेत. शेतकऱ्यांना आपला कारखानना पाहिजे होता. म्हणून हा कारखाना काढला. त्यावेळी कोल्हापूर आयकर विभागाने हजारो शेतकऱ्यांची चौकशी केली होती. याची काही माहिती सोमय्या यांना नाही. राजकारणात प्रतिमा तयार करण्यासाठी अनेक वर्ष लागतात. माझ्यावर एकही आरोप नाही, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. 

माझ्यावर कोणताच आरोप नाही. मी येत्या दोन आठवड्यामध्ये किरीट सोमय्या यांच्यावर फौजदारीचा १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. पुढील १० वर्षे कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला स्थान नाही. त्यामुळे माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बांधकाम विभागामध्ये भ्रष्टाचार केला आहे. त्याच्या विरोधात ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचे, मुश्रीफ यांनी सांगितले.  

सोमय्या यांचा आरोप काय? 

मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केला. याबाबत सोमय्या यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांच्याविरुद्ध आयकर अधिकाऱ्याकडे तक्रार करून मुश्रीफ कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

सोमय्या यांनी सांगितले, की मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून येते आहे. नावेद मुश्रीफ यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविताना आपल्या उत्पन्नाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येते आहे. नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक असल्याचे दिसते आहे. या साखर कारखान्याने अनेक मनी लाँडरिंग व्यवहार केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते, असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. 

निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात नावेद यांनी सीआरएम सिस्टीम या कंपनीकडून २ कोटींचे तर मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स या कंपनीकडून ३.८५ कोटींचे कर्ज घेतल्याचे दिसते आहे. या दोन्ही कंपन्या कोलकाता येथील असून यांचे संचालक असलेले सिकंदर देसाई, आलमगीर मुजावर, गोपाळ पवार हे मुश्रीफ यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. श्रीमती सहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख ७८ हजार ३४० शेअर्स आहेत. २००३ ते २०१४ या काळात हसन मुश्रीफ हे राज्यात कॅबिनेट मंत्री होते.

या काळात घोरपडे साखर कारखान्याला शेल कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. या कारखान्याच्या नावावर जमा झालेल्या रकमा मरुभूमी फायनान्स कडून १५. ९० कोटी, नेक्स्टजेन कन्सल्टन्सी कडून ३५. ६२ कोटी, युनिव्हर्सल ट्रेंडी एलएलपी कडून ४.४९ कोटी, नवरत्न असोसिएट्स कडून ४. ८९ कोटी, रजत कन्झ्युमर सर्व्हिसेस कडून ११.८५ कोटी, माऊंट कॅपिटल कडून २.८९ कोटी.     

उद्या मुंबई ईडीकडे तक्रार करणार आहे. त्यांना पुरावे देणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालय कडे पुरावे देणार आहे. ठाकरे सरकारच्या ११ खेळाडूंमध्ये राखीव खेळाडूमध्ये वाढ होणार आहे, असे सोमय्या यांनी सांगितले होते.

Edited By - Amol Jaybhaye      

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com