नियती ठरवेल तेव्हाच फडणवीस शपथ घेतील... हसन मुश्रीफ - Hasan Mushrif criticizes Devendra Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

नियती ठरवेल तेव्हाच फडणवीस शपथ घेतील... हसन मुश्रीफ

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 एप्रिल 2021

नियती ठरवेल तेव्हाच फडणवीस शपथ घेतील, असा टोला हसन मुश्रीफ यांनी फडणवीसांना लगावला आहे.

कोल्हापूर : ''जनतेचे लक्ष वेधण्यासाठी विरोधक सनसनाटी विधाने करीत असतात.  केंद्रीय संस्था त्यांच्याच ताब्यात आहेत. ते जे सांगताहेत तेच होत आहे. त्यामुळे अॅाक्सिजन, रेमडेसिविरबाबत केंद्र सरकावर जनतेची नाराजी झाली आहे. रेमडेसिविरचा अपुरा पुरवठा होत असतानाच हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाषणे करीत आहेत. ममता बॅनर्जींना हरविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत,'' असे राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. 

माजी पोलिस अधिकारी ज्युलिओ रिबेरो (Julio Ribeiro)यांनी नुकताच एक लेख लिहून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले होते.  याचा संदर्भ हसन मुश्रीफ यांनी दिला. रिबेरो म्हणतात की पाच वर्ष मुख्यमंत्री आणि गृहमंत्री भूषविलं अशा माणसाने रात्री पोलिस ठाण्यात जाऊन दबाब आणावा, हे फार चुकीचे होते. ते फोनवर सांगू शकले असते. फडणवीसांमुळे समाजात चुकीचा मेसेज जातो, हे बरोबर नाही, असे रिबेरो म्हणतात.

फडणवीस फार अस्वस्थ झालेले आहेत. त्यांना इतकं अस्वस्थ होण्याची काय गरज आहे. मी अनेक वेळा सांगितले की नियती ठरवेल तेव्हाच फडणवीस शपथ घेतील, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणून ते होणार नाही, असा टोला हसन मुश्रीफ यांनी फडणवीसांना लगावला आहे.भाजपचे नेते पुन्हा सत्तेत येण्यासाठी उतावीळपणे राजकारण करत आहेत. या नादात देवेंद्र फडणवीस यांनी नसत्या चुका केल्याची टिप्पणी ज्युलिओ रिबेरो  यांनी केली होती. या टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनीही लेख लिहूनच प्रत्युत्तर दिले आहे. या लेखात देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आहे. 

हेही वाचा : बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी विमानयात्रांवर शंभर कोटी खर्च..९० टक्के भाजपचा वाटा
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलं आहे. येथे  आठ टप्प्यात विधानसभा निवडणुका होत आहे.  आतापर्यंत सात टप्प्यातील मतदान झाले आहे. सर्वच पक्षांनी आपली ताकद लावून प्रचाराचा धुराळा उडविला आहे. नेत्यांनी आत्तापर्यंत विमानप्रवासावर शंभर कोटी रुपये खर्च केले आहेत. यातील ९२ टक्के नेते हे भाजपमधील आहेत. भाजपच्या स्टारप्रचारकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपध्यक्ष जे.पी. नड्डा, मंत्री, स्मृति इराणी यांचा समावेश आहे. 'आईएएनएस'ने हे वृत्त दिले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तसेच तृणमूल कॅाग्रेसचे काही नेते विशेषतः उत्तर बंगालमध्ये प्रचारासाठी विमानयात्रा करीत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख