चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य आणि वाझेंचे पत्र हा योगायोग नाही! - Hasan Mushrif criticizes BJP over Sachin Waze's letter | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य आणि वाझेंचे पत्र हा योगायोग नाही!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

अँटिलिया जवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन खून प्रकरणाचा योग्य तपास होण्याची गरज आहे''.

मुंबई :  एनआयएच्या NIA कोठडीत असलेला निलंबित सहायक पोलिस निरिक्षक सचिन वाझेने (Sachin Vaze) यांनी लिहिलेले पत्र हे भारतीय जनता पक्षाने (BJP) दिले असावे, असे माझे मत असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. 

मुश्रीफ यांनी मुंबईत गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आणि महाविकास आघाडी सरकारवर झालेल्या आरोपांना उत्तर दिले. मुश्रीफ म्हणाले, ''भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की आणखी एक मंत्री राजीनामा देईल. त्यांचे वक्तव्य आणि सचिन वाझे यांचे पत्र हा योगायोग नाही. अँटिलिया जवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन खून प्रकरणाचा योग्य तपास होण्याची गरज आहे''.

राज्य सरकारच्या प्रयत्नांना साथ द्या-शरद पवारांचे जनतेला आवाहन 

''सचिन वाझे यांना विरोध असतानाही त्यांची नियुक्ती करण्यात आली. वाझे हे परमबीरसिंग यांनाच रिपोर्टींग करत होते. मंत्रालयात आणि दुसऱ्या ठिकाणी जाताना परमबीरसिंग यांच्यासोबत वाझे असायचे. वाझे ऑफिसला येताना बीएमडब्ल्यू आणि मर्सिडिजने येत होते, तेव्हाच कारवाई का केली नाही? तुरुंगातून पत्र लिहिणे योग्य नाही''. असेही मुश्रीफ म्हणाले. 

राफेलची चौकशी थांबवली

''परब यांनी आपल्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगितले. राफेल भ्रष्टचाराचे प्रकरण आपण थांबवले, कोणतीही चौकशी करु दिली नाही. मात्र, फ्रान्सच्या माध्यमांनी हा विषय पुढे आणला आहे. त्यातून भाजपने काही बोध घेतला पाहिजे. कामगार विभागाचा मी कालच कार्यभार स्वीकारला आहे. कामगारांचे प्रश्न आहेत. कामगारांनी कोणत्याही राज्यात जाऊ नये. आम्ही त्यांची व्यवस्था करु, असे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले. देशात 18 वर्षावरील सगळ्यांना लस मिळावी, परदेशात लस पाठवणे केंद्र सरकारने थांबवले पाहिजे'', असेही मुश्रीफ म्हणाले.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दावा खोटा...महाराष्ट्रच नव्हे तर भाजपची सत्ता असलेल्या राज्यांतही लस टंचाई
 

सचिन वाझे यांनी थेट परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुंबई पालिकेतील ठेकेदारांकडून पैसे गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. तसेच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी देखील दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा जबाब त्यांनी पत्र लिहून न्यायदंडाधिकाऱ्यांना दिला आहे. मुंबई महापालिकेतील वादग्रस्त 50 कंत्राटदारांकडून प्रत्येक दोन कोटी रुपये गोळा करण्याचे काम परब यांनी सांगिल्याचा दावा वाझे यांनी केला आहे.

दरम्यान, अनिल परब यांनी हे आरोप फेटाळले आहेत सरकारची बदनामी करण्यासाठी हे पत्र दिले आहे. सचिन वाझे कस्टडीत आहे. त्याने अजून कोणाकडे तक्रार केली नाही. अशी पत्रे बाहेर काढून सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. वाझे काही काळ शिवसेनेत होते. प्रदीप शर्मा Pradip Sharma पण शिवसेनेचे Shivsena उमेदवार होते मान्य करतो. पण वाझेंना शिवसेनेने अस काम करायला सांगितले नाही. 

केंद्रीय यंत्रणाच वापर कसून शिवसेनेच्या मागे ससेमिरा लावला आहे. बदनामीचा हा लेटर बॉम्ब काढून आम्हाला काही होणार नाही. मला चौकशीला बोलवा मी दोषी असेल तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील. मी पूर्णपणे कायदेशीर लढणार मी लढाईच्या तयारीत आहे. अश्या धमक्यांना घाबरत नाही. मला टार्गेट करून मुख्यमंत्र्याना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रत्युत्तर परब यांनी दिले होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख