गुलाबराव पाटील म्हणतात, "कलाकार यूपीत जाऊन काय डाकू बनणार का ? '

मुंबई सुरक्षित आहे. उत्तरप्रदेशात दिवसा ढवळ्या बॅंकेत दरोडे पडतात
गुलाबराव पाटील म्हणतात, "कलाकार यूपीत जाऊन काय डाकू बनणार का ? '

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. ही स्वप्नाची नगरी आहे. येथी कलाकार उत्तर प्रदेशात जाऊन काय डाकू बनणार आहेत का ? असा सवाल शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. 

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी बॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते आणि उद्योगपतींबरोबर चर्चा केली. योगी हे बॉलीवूड यूपीला हलविणार असल्याची टीका विशेषत: शिवसेनेने सुरू केली आहे. खासदार संजय राऊतांपासून ते गुलाबराव पाटील यांच्यापर्यंतच्या नेत्यांनी योगींच्या मुंबई भेटीवर सडकून टीका केली आहे. 

मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना योगी यांचे नाव न घेता टीका केली आहे. ते म्हणाले, की नुसत्या इथल्या बॅंका कुणी लुटल्या हे पाहिलं तरी कळेल. लगेच बॉलिवूड हलवायला तिथे सुरक्षितता आहे का ?

उलट मुंबई सुरक्षित आहे. उत्तरप्रदेशात दिवसा ढवळ्या बॅंकेत दरोडे पडतात.. तिथे गुंतवणूक करणे किती उचित आहे म्हणून बॉलिवूड उत्तरप्रदेशला जाणार या बाबत माझ्या मनात शंका आहे. 

दरम्यान, संजय राऊत यांनीही आज योगींचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. ते म्हणाले, की योगी तमिळनाडूत जाणार आहात का ? ती पण मोठी चित्रपटसृष्टी आहे. की त्यांचा पंगा फक्त मुंबईशी आहे ? अक्षय कुमार आंब्याची पेटी घेऊन गेले असतील ? असे सवाल करतानाच या पूर्वी अनेकांनी मुंबईला ओरबडून नेण्याचे प्रयत्न केले गेले अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

योगी आदित्यनाथ आज मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. मुंबईच्या बॉलिवूडप्रमाणे उत्तरप्रदेशातही यूपी सरकारला स्वत:ची फिल्मसिटी विकासीत करायची आहे. त्या दृष्टीने योगी यांनी बॉलीवूडमधील काही निर्माते, अभिनेते आणि उद्योगपतींशी चर्चा केली. योगींच्या मुंबई भेटीवर मनसे, शिवसेना, राष्ट्रवादीच्या नाराजी व्यक्त करीत टीकाही केली आहे. 

संजय राऊत याविषयी म्हणाले, की योगी आदीत्यनाथ हे साधू आहेत सप्ततारांकीत हॉटेल मध्ये आहेत. नोयडा मधील चित्रपटसृष्टीची अवस्था काय आहे ते सुद्धा त्यांनी सांगावे. योगी तामिळनाडूत जाणार आहेत का तीपण मोठी चित्रपटसृष्टी आहे त्यांचा पंगा फक्त मुंबईशी आहे का ? आमच्या शुभेच्छा..तुम्ही भिंती उभी कराल पण चित्रपट सृष्टी निर्माण करणार का ? 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com