कॉंग्रेसच्या जम्बो कार्यकारिणीवर गुजराती कार्यकर्ते नाराज 

याबाबत वरिष्ठांकडे भूमिका मांडणार असल्याचे कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी खासगीत सांगितले.
Gujarati Activist upset over Congress' Mumbai Jumbo executive
Gujarati Activist upset over Congress' Mumbai Jumbo executive

मुंबई : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी मुंबई कॉंग्रेसच्या जंबो कार्यकारिणीची नुकतीच घोषणा केली. यामध्ये 6 वरिष्ठ उपाध्यक्ष, 42 महासचिव, 76 सचिवांचा समावेश आहे. मात्र, या कार्यकारिणीमध्ये एकाही गुजराती पदाधिकाऱ्याची वर्णी न लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत वरिष्ठांकडे भूमिका मांडणार असल्याचे कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी खासगीत सांगितले. 

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. त्यासाठी राजकीय पक्ष सदस्य नोंदणीवर भर देत आहेत. कॉंग्रेसमध्येही संघटना पातळीवर मोठे फेरबदल केले जात आहेत. त्यात कॉंग्रेसने नुकतीच मुंबईसाठी जम्बो कार्यकारिणीची घोषणा केली आहे. 

मुंबईतील सर्व सहा लोकसभा क्षेत्रांसाठी एक जिल्हाध्यक्ष आणि दोन कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या नियुक्तीनंतर ईशान्य मुंबईतील गुजराती कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्‍चिम-पूर्व, भांडुप, मुलुंड आदी विभागांत मराठीनंतर गुजराती मतदार मोठ्या संख्येने आहेत. असे असताना कॉंग्रेसच्या जम्बो कमिटीमध्ये ईशान्य मुंबईतून एकाही गुजराती कार्यकर्त्याला पद न दिल्याने गुजराती कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह आहे. 

हेही वाचा : हिंगण्यात भाजपला खिंडार : आमदार मेघेंवर नाराज होऊन 56 जणांनी बांधले घड्याळ 

नागपूर : हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांच्या कार्यप्रणालीला वैतागलेले भाजपचे माजी जिल्हा महामंत्री आणि माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह 56 बुथप्रमुखांनी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगणा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेश बंग व विजय घोडमारे यांच्या नेतृत्वात हा प्रवेश करण्यात आला. हिंगणा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. आपल्याला 2024 मध्ये तिथे विजय मिळवायचा आहे, यादृष्टीने पक्षबांधणी सुरू करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवीन पक्ष सदस्यांना केले. भाजप 15 वर्षे विरोधात असताना तुम्ही तो पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले. असे असतानाही इतर पक्षातून भाजपात आलेल्यांना तिकिटं देऊन भाजपने निष्ठावंत नेत्यांवर अन्याय केला. इथे मात्र असे होणार नाही, अशी खात्री पाटील यांनी प्रेम झाडे व त्यांच्या सहकाऱ्यांना दिली. 

याआधी तुम्ही ज्या पक्षात होतात, त्या पक्षाला ताकद देण्याचे काम केले. मात्र त्या पक्षात तुमच्यावर अन्याय झाला. याची दखल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने घेतली असून पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com