मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या तपासासाठी SIT : गुजरातच्या माजी गृहमंत्र्याचे घेतले होते नाव

सचिन वाझे यांना अटक करण्याची भाजपने मागणी केली होती.
anil deshmukh ff.
anil deshmukh ff.

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या खूनात सचिन वाझे यांना अटक करण्याची देवेंद्र फडणवीस यांची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळली. त्याऐवजी दिव-दमणचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमण्याची घोषणा त्यांनी केली.  

खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी आणि मनसुख हिरेन यांच्या खूनप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत निवेदन केले. आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्यांची नावे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवली आहे. दादार-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्या नावाच उल्लेख डेलकर त्या चिठ्ठीत प्रामुख्याने केला आहे. पटेल आणि काही अधिकाऱ्यांच्या दबावाखाली मला त्रास देण्यात येत होता, अडचणी येत होत्या आणि सामाजिक जीवनातून उध्वस्त करण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या, असे डेलकर यांनी आपल्या चिठ्ठीत लिहून ठेवल्याची माहिती देशमुख यांनी सभागृहात दिली. प्रफुल्ल खेडा पटेल हे गुजरातचे माजी गृहमंत्री आहेत. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच पटेल हे गृहमंत्री होते, अशीही देशमुख यांनी सांगितले.

``महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र शासन यांच्यावर माझा विश्वास आहे. मला न्याय मिळेल म्हणून मी मुंबईमध्ये आत्महत्या करत असल्याचे डेलकर यांनी लिहून ठेवले. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन, पुत्र अभिनव यांनीसुद्धा मला पत्र लिहिले आहे. त्या पत्रातही त्यांनी प्रफुल्ल खेडा पटेलांवर आरोप लावले आहेत. माझे वडिल हे प्रचंड दबावाखाली होते, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे,``अशी माहिती देशमुख यांनी या वेळी दिली. डेलकर यांच्या मुलाचाही महाराष्ट्राच्या प्रशासनावर त्यांचा विश्वास असल्याचे यातून दिसते. त्यामुळे डेलकर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाची चौकशीसाठी विशेष पथक नेमण्यात येणार असल्याची घोषणा देशमुख यांनी केली. 

मध्य प्रदेशचे आयएएस अधिकारी राजेश श्रीवास्तव यांनी देखील नागपुरात येऊन आत्महत्या केली. त्यांचादेखील डेलकर यांच्याप्रमाणे उद्देश असावा. मध्य प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे. तेथे न्याय मिळणार नाही, हे माहीत असल्याने श्रीवास्तव यांनी नागपुरात आत्महत्या केली असावी, असा दावा देशमुख यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com