गुन्ह्यात नावचं नाही, तर गुन्हा रद्द करण्याची रश्मी शुक्लांची मागणी कशासाठी?

दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी शुक्ला यांच्यातर्फे केली जाऊ शकत नाही,'' असा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे.
गुन्ह्यात नावचं नाही, तर गुन्हा रद्द करण्याची रश्मी शुक्लांची मागणी कशासाठी?
Rashmi Shukla.jpg

मुंबई : ''फोन टँपिंग प्रकरणात दाखल गुन्ह्यात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला Rashmi Shukla याचं नाव नाही, त्यामुळे या प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी शुक्ला यांच्यातर्फे  केली जाऊ शकत नाही,'' असा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयकडून केल्या जाणाऱ्या तपासाशीही या प्रकरणाचा काहीही संबंध नाही, असा दावाही राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात केला आहे. गोपनीय आणि संवेदनशील माहिती उघड केल्याच्या आरोपप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेत गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.

फोन टँपिगसाठी तत्कालिन अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम कुंटे  Sitaram Kunte यांची परवानगी घेण्यात आली होती, असा दावा शुक्लांनी केला आहे. मात्र, ही परवानगी घेताना दिशाभूल केल्याचं कुंटेनी म्हटले आहे.  राज्य गुप्तचर विभागाकडून गोपनीय व संवेदनशील माहिती उघड केल्याबाबतचे हे प्रकरण आहे. याबाबत सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.  

काय आहे प्रतिज्ञापत्रात? 

  • गोपनीय आणि संवेदनशील माहिती उघड केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  • शुक्ला यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे त्या हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करू शकत नाहीत. 
  • या प्रकरणी सुरू असलेल्या तपासासाठी आवश्यक माहिती मिळवण्याच्या हेतूने शुक्ला यांना नोटीस बजावण्यात आली होती. 
  • राज्य गुप्तचर विभागाच्या संगणकात असलेली माहिती पेन ड्राइव्हवर घेऊन त्याच्या प्रती नंतर बेकायदेशीररीत्या तिसऱ्या पक्षाला देण्यात आल्या. 
  • माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार हा गुन्हाच आहे. सूड उगवण्यासाठी आपल्यावर गुन्हा दाखल केल्याच्या शुक्ला यांचा आरोपही निराधार आहे.


जावेद अख्तर यांना अटक करण्यापासून शिवसेनेला कोणी रोखलं ?
मुंबई : ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर Javed Akhtar यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली आहे. यावरुन आता राजकारण पेटलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. तर भाजपचे आमदार राम कदम Ram Kadam यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. ''जावेद अख्तर यांना अटक करण्यापासून कोणी रोखलं आहे,'' असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.