गोपीचंद पडळकरांचं आता थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान...

औंढा नागनाथ येथील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे 16 मार्चला अनावरण करणार पडळकर यांनीजाहीर केले आहे.
Gopichand Padalkar challenges the Chief Minister will unveil a statue of Ahilya Devi
Gopichand Padalkar challenges the Chief Minister will unveil a statue of Ahilya Devi

मुंबई : जेजुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. औंढा नागनाथ येथील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे 16 मार्चला अनावरण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. हे जाहीर करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावल्याने अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या अनावरणावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

जेजुरी येथील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. पण पडळकर यांनी आदल्यादिवशीच पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीकाही केली होती. पडळकर यांच्या या कृतीने राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. राष्ट्रवादीकडून पडळकरांना जोरदार प्रत्यूतर देत त्यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. 

आता पडळकर यांनी आपला मोर्चा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे वळवला आहे. औंढा नागनाथ येथील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावर 16 मार्चला मेंढपाळ बांधवांच्या हस्ते करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्याची कार्यक्रम पत्रिका त्यांनी ट्विट केली असून त्यासोबत एक व्हिडिओही जोडला आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

''मागील वर्षभरापासून पुतळ्याचे अनावरण रखडले आहे. पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. माझे कुटूंब माझी जबाबदारी यातून मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला नसेल. त्यामुळे 16 तारखेला पुतळ्याचे अनावरण करणार आहे. बहुजन समाजबांधवांनी सर्वांनी या कार्यक्रमाला यावे,'' असे पडळकर यांनी म्हटले आहे. पडळकर यांच्या या आव्हानानंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. 

काय घडले होते जेजुरीत?

गोपींचंद पडळकर यांनी 12 फेब्रुवारी रोजी पहाटे जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक हे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते 13 तारखेला होणार होते. पडळकर यांच्या या स्टंटनंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न करताना पडळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली यावरून पोलिसांनी पडळकर यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा  तसेच पोलिसांच्या झटपट केल्याचा व जिल्हाधिकारी यांचा आदेश डावलल्याचा  गुन्हा दाखल केला आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com