GOOD NEWS : उद्धव ठाकरे आमदारांना आमनेसामने भेटणार ! 

GOOD NEWS : उद्धव ठाकरे आमदारांना आमनेसामने भेटणार ! 

परब यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची दखल घेत काही प्रश्‍नही उपस्थित केले.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमदारांना भेटणार नाही तर कोणाला भेटणार, विभागवार आमदारांच्या बैठका होणार आहेत. स्थानिक प्रश्न मार्गी लागतील गेले अनेक दिवस व्हर्चुअल मीटिंग्स होत होत्या. आता आमनेसामने बैठका होतील अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिली. 

परब यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची दखल घेत काही प्रश्‍नही उपस्थित केले. मुख्यमंत्री ठाकरे हे मातोश्रीबाहेर पडत नाही अशी टीका भाजपचे लहानमोठे नेते आणि कार्यकर्ते करीत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वानीच काळजी घेणे कसे गरजेचे आहे हे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. 

सुशांत प्रकरणात शिवसेनेची नाहक बदनामी केली गेली त्याची भरपाई कोण देणार ? असा सवाल करून परब म्हणाले, की सुशांत हा ड्रग्स घेत होता हे सगळेच जण सांगत आहेत. त्याच्यासाठी दिल्लीची टीम मुंबईत आली पण काय साध्य झाले ? या प्रकरणात जे छाती बडवून घेत होते ते आता कुठे गेले ? 

मराठा आरक्षणावरून कोणी राजकारण करू नये, सर्वांच्या संमतीनं हे विधेयक विधिमंडळात पास झालं होतं मग आता राजकारण करायची काय गरज असा सवालही परब यांनी केला आहे. 

सुशांतसिंह प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईला पीओक म्हणणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी भाषेत उल्लेख करणे, महापालिकेने कंगनाचे घर पाडणे आदी मुद्यावरून शिवसेनेला विरोधीपक्ष विशेषत: भाजप लक्ष्य करीत होता. सुशांतप्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस करीत होते. ही चौकशी योग्य दिशेने सुरू असताना मुंबई पोलिसांवरच अविश्वास दाखविला. 

कंगनासारखी नटी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवित होती. तिच्याप्रमाणे बिहारचे निवृत्त डीजीपी पांडे हे ही तशीच टीका करीत होते. सुशांतप्रकरणावरून शिवसेनेवरही आरोप झाले. मात्र शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीही जशासतसे उत्तर देऊन विरोधकांचा समाचार घेतला होता. 

सुशांतप्रकरणाचा तपास सीबीआय करीत होते पण, त्यांच्यानंतर ड्रग्जप्रकरणाची चौकशी एनसीबीने केली. या मुद्याकडे लक्ष वेधत अनिल परब यांनी काही प्रश्‍न उपस्थित करतानाच जे शिवसेनेवर टीका करीत होते त्यांचाही समाचार घेतला आहे. ते म्हणाले, की सुशांत हा ड्रग्स घेत होता हे सगळे सांगत आहेत. त्याच्यासाठी दिल्लीची टीम मुंबईत आली पण काय साध्य झाल ं? सुशांत प्रकरणात जे छाती बडवून घेत होते ते आता कुठे गेले ? 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com