बेळगावच्या बदल्यात मुंबई द्या; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज बेळगाव महाराष्ट्रात घेणारच, अशी गर्जना केली. तसेच सीमावादाचा प्रश्न संपेपर्यंत हा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणीही केली.
Give Mumbai in exchange for Belgaum says karnataka minister
Give Mumbai in exchange for Belgaum says karnataka minister

निपाणी : बेळगावच्या सीमावादावरून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आज मुक्ताफळे उधळली. मुंबई प्रांत पूर्वी कर्नाटकात होता. त्यामुळे महाराष्ट्राने बेळगाव घेऊन मुंबई कर्नाटकाला द्यावी, अशी अजब मागणी त्यांनी केली आहे. तर एका मंत्र्याने महाराष्ट्र एकीकरण समितीवरच बंदी घालण्याचे वक्तव्य केले आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज बेळगाव महाराष्ट्रात घेणारच, अशी गर्जना केली. तसेच सीमावादाचा प्रश्न संपेपर्यंत हा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणीही केली. त्यावर बोलातना सवदी यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, पुर्वी कर्नाटकात असलेला मुंबई हा प्रांत भाषावार प्रांतरचना झाल्यावर तो महाराष्ट्रात गेला. तर बेळगाव कर्नाटकाला मिळाले. मराठी भाषिकांच्या मागणीनुसार मुंबई भागातील कन्नड नागरिकांवरही आपला हक्क आहे. त्यामुळे वारंवार बेळगाव, निपाणीची मागणी करू नये. बेळगाव घेऊन कर्नाटकला मुंबई द्या, अशी भूमिका सवदी यांनी मांडले.

बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेणार आहे. त्यानुसार सीमाप्रश्न संपविला जाईल. टप्प्याटप्प्याने समिती मोडीत काढली जाईल, असेही सवदी यांनी जाहीरपणे सांगितले.

कर्नाटकचे वस्त्रोद्योगमंत्री श्रीमंत पाटील यांनीही समितीवर बंद घालण्याचे वक्तव्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयात दावा सुरू असला तरी सीमाप्रश्‍न हा संपलेला अध्याय आहे, असे ते म्हणाले. कर्नाटकचे दुसरे उपमुख्यमंत्री यांनीही कर्नाटकात राहणारे सर्व कनडगी असल्याचे वक्तव्य करून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले होते. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज 'महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कर्नाटक सरकारवर टीकास्त्र सोडले होते. बेळगाव सीमावादाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये असूनही कर्नाटक सरकारने बेळगावचे नामांतर केले. हा उर्मटपणा आहे. हे सरकार बदललेल्या नावाप्रमाणेच बेलगाम असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला होता. 

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या टीकेनंतर कर्नाटकातील मंत्र्यांकडून प्रत्यूतर दिले जात आहे. यांनी कर्नाटकमध्ये राहणारे सर्वजण कन्नडिगा असल्याचे म्हटले. मराठी भाषिकांच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापण करणारे आमचे एकमेव राज्य आहे. विनाकारण वाद निर्माण करणे चुकीचे आहे. आपण सर्व भारतीय आहोत, असे त्यांनी सांगितले.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com