मुंबई : नाशिकमध्ये महिलेच्या चारित्र्याच्या संशयावरून तिला उकळत्या तेलात हात बुडवून अग्निपरिक्षा द्यायला लावणाऱ्या जातपंचायतीच्या कृत्याबाबत कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून पुरोगामी महाराष्ट्रासाठी शोभादायक नाही. गेल्या महिन्यात पुणे जिल्ह्यातील एका जातपंचायतीने एका महिलेच्या बाबतीत असाच प्रकार केला होता. त्यावेळी फक्त भारतीय जनता पक्षानेच निषेध करत कडक कारवाई करण्यास भाग पाडले होते. आताही सरकारकडून तसेच पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाईची अपेक्षा असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.
लॅाकडाउनसाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम : राज्यात यात्रा, मिरवणुका, आंदोलन, मोर्चांना बंदी
जातपंचायतींवर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात अस्तित्वात असलेल्या कायद्याची सरकारने कठोर अंमलबजावणी करावीच. पण असे प्रकार रोखण्यासाठी त्या कायद्यात काही त्रुटी असल्यास त्या दूर करून तो कायदा आणखी कठोर करण्यासाठीही सरकारने पावले उचलावीत. त्यासंदर्भात सरकारने अभ्यास करावा, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.
सलग बारा दिवसांच्या भडक्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला 'ब्रेक'
सरकारने यासंदर्भात कायदा करूनही हे प्रकार थांबले नाहीत. त्यामुळे प्रशासनाचा धाक कोणालाही नाही, हेच दिसून येत आहे. राज्याच्या ग्रामीण भागात असे प्रकार वारंवार घडत आहेत. ते थांबविण्यासाठी सरकारने कठोर उपाय योजना कराव्यात; अन्यथा हे प्रकार वाढीस लागतील, असा इशाराही दरेकर यांनी दिला.
Edited By - Amol Jaybhaye

