अभिनंदन यांची सुटका न केल्यास भारत पाकवर हल्ला करेल या भितीने जनरल बावजा यांना घाम फुटला होता !  - General Bawja was sweating for fear that India would attack Pakistan if Abhinandan was not released! | Politics Marathi News - Sarkarnama

अभिनंदन यांची सुटका न केल्यास भारत पाकवर हल्ला करेल या भितीने जनरल बावजा यांना घाम फुटला होता ! 

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

अभिनंदन वर्धमान याला सोडले नाहीत तर भारत त्याच रात्री नऊ वाजता पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्‍यता आहे.

इस्लामाबाद : "" जर अभिनंदन वर्धमान यांना सोडले नाही तर आज रात्रीच नऊ वाजता भारत पाकिस्तानवर हल्ला करेल अशी भिती व्यक्त केल्यानंतर पाकिस्तानचे जनरल कमर जावेद बाजवा यांचा धरकाप उडाला होता, त्यांना घाम फुटला होता अशी धक्कादायक माहिती पाकिस्तानातील पीएमएल-एन पक्षाचे नेते अयाज सादिक यांनी दिल्याने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. 

सादिक यांनी पुढे असेही म्हटले आहे, की विदेशमंत्री शहा महमूद कुरेशी यांनी एका महत्त्वाच्या बैठकीत असे सांगितले होते की जर पाकिस्तानने भारताचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याला सोडले नाहीत तर भारत त्याच रात्री नऊ वाजता पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्‍यता आहे. कुरेशी यांच्या माहितीनंतर जनरल जावेद बावजा हे प्रचंड तणावा खाली आले होते आणि त्यांचे हातपाय कापत होते अशी धक्कादायक माहिती कुरेशी यांनी दिली आहे. 

त्यावेळी जी बैठक झाली होती त्या बैठकीतच इम्रान खान सरकारने अभिनंदन यांची सुटका करण्याचा म्हणजे त्यांना भारताकडे सोपविण्याचा निर्णय घेतला होता अशी माहितीही त्यांनी दिली आहे. 

पाकिस्तानच्या नेशनल असेंब्लीमध्ये झालेल्या भाषणात मुस्लिम लीग-एन (पीएमएल-एन) या पक्षाचे नेते अयाज सादिक यांनी सांगितले, की विदेश मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक त्यावेळी बोलाविली होती. त्या बैठकीत बोलताना विदेश मंत्री म्हणाले, की जर आपण अभिनंदन यांची सुटका केली नाही तर भारत आपल्यावर हल्ला करण्याची शक्‍यता आहे. ही माहिती ऐकून जनरल बाजवा यांच्या पाया खालची वाळूच सरकली होती. 

सादिक यांनी पुढे असेही सांगितले, की अभिनंदन याला अटक झाल्यानंतर कुरेशी यांनी एक बैठक तातडीने बोलावली होती. या बैठकीत पीपीपी आणि पीएएन-एन या पक्षाचे नेते आणि जनरल बाजवा हे उपस्थित होते. जेव्हा परराष्ट्रमंत्र्यांनी अभिनंदन यांच्या सुटकेविषयी आणि भारत हल्ला करण्याची शक्‍यता वर्तविली त्यावेळी जनरल बावजा यांना काय बोलावे आणि काय सांगावे हे कळलेच नव्हते. असे स्पष्ट केले.भारत हल्ला करणार असल्याचे असे सांगताच जनरल सादिक यांना कसा घाम फुटला होता हे सांगण्यासही सादिक विसरले नाहीत. 

दरम्यान, या बैठकीला पंतप्रधान इम्रान खान उपस्थित नव्हते असेही त्यांनी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख