विलासराव देशमुखांच्या वाढदिवशी..रितेश, जेनेलियाची भावुक पोस्ट व्हायरल... - genelia deshmukh riteish deshmukh shares emotional post on birth anniversary vilasrao deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

विलासराव देशमुखांच्या वाढदिवशी..रितेश, जेनेलियाची भावुक पोस्ट व्हायरल...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 मे 2021

“वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा, आम्ही तुमची आठवण काढतो. बापलेकीची मिठी जी चिरंतन राहील”

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री, कॅाग्रेसचे नेते विलासराव देशमुख Vilasrao Deshmukh यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. विलासराव यांचे चिंरजीव अभिनेता रितेश देशमुख आणि स्नुषा अभिनेत्री जेनेलिया देशमुख Genelia Deshmukhयांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करुन विलासरावांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.  genelia deshmukh riteish deshmukh shares emotional post on birth anniversary vilasrao deshmukh

जेनेलिया नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव असते. तिनं शेअर केलेल्या पोस्टची नेटकरी नेहमी दखल घेऊन त्यावर चर्चा होत असतं.

 यापूर्वीही जेनेलियानं मदर्स डे निमित्त सासूबाईविषयी पोस्ट शेअर केली होती. तर रितेशचा नृत्य करतानाच व्हिडिओही तिनं शेअर केला होता. आज रितेश, जेनेलिया यांनी विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर केले आहेत. 

जेनेलियानं विलासराव यांना मारलेल्या मिठीचा फोटो शेअर केला आहे. ती आपल्या टि्वटमध्ये म्हणते, “वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा, आम्ही तुमची आठवण काढतो. बापलेकीची मिठी जी चिरंतन राहील” रितेशने जेनेलियाचं टि्वट रिटि्वट केलं आहे. तर रितेशनं आपल्या वडीलांसोबत लहानपणाचा फोटो शेअर केला आहे.   

हेही वाचा :  भाजपचे टुलकिट म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा..रणदीप सुरजेवाला यांचा टोला 

नवी दिल्ली :  कथित टुलकिट प्रकरणी कॅाग्रेसने ११ मंत्र्यांच्या टि्वटबाबत टि्वटरला पत्र पाठविले आहे. या ११ मंत्र्यांच्या टि्वटला मैनुपुलेटिव मीडीयाचे टॅग देण्याची मागणी कॅाग्रेसचे प्रवक्ता  रणदीप सुरजेवाला यांनी टि्वटरला पत्राव्दारे केली आहे.  गिरिराज सिंह, पियुष गोयल, स्मृती इरानी, रविशंकर प्रसाद, प्रल्हाद जोशी, धमेंद्र प्रधान, रमेश पोखरियाल निंशक थावरचंद्र गहलोत, डॅा. ह्रर्षवर्धन. मुख्तार नकवी, गजेंद्र सिंह शेखावत आदी मंत्र्याच्या टि्वटवर कारवाईंची मागणी केली आहे.  कथित टूलकिट प्रकरणात नोटीस बजावण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ट्विटर-इंडिया कंपनीचे कार्यालय गाठल्यानंतर, दुसऱ्या दिवशी, मंगळवारी काँग्रेसने भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली. भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांचेच ट्वीट नव्हे तर, केंद्रातील ११ मंत्र्यांच्या ट्विटचेही ‘फेरफार केलेला मजकूर’ असे वर्गीकरण केले जावे, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसने ट्विटरला पाठवले. 

Edited by : Mangesh Mahale    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख