एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण थकीत वेतन दिवाळीपूर्वी  : अनिल परब - Full pay of ST employees before Diwali: Anil Parab | Politics Marathi News - Sarkarnama

 एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण थकीत वेतन दिवाळीपूर्वी  : अनिल परब

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

शासनाकडून एसटीसाठी पुढील सहा महिन्यासाठी आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे.

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येत आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच भूमिका होती त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. आज उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक झाली. आणि यावर मार्ग काढण्यात आला आहे.

परब म्हणाले, टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतुक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली.

 आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल. शासनाकडून ही आता आर्थिक मदत मिळाल्याने एसटीच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे  असल्याचेही परब यांनी सांगितले.

परब यांनी कालही पत्रकार परिषद घेऊन कर्मचाऱ्यांना एक तासात वेतन देण्याचे जाहीर केले होते. आत्महत्यासारखं कठोर पाऊल उचलू नका. तात्पुरत्या संकटातून आपण नक्की मार्ग काढू.दुःखी होऊन अश्‍या कोणत्याही टोकाचं पाऊल घेऊ नये असे आवाहन त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले होते. 

गेल्या काही दिवसापासून थकित वेतनासाठी एसटीचे कर्मचारी आंदोलन करीत आहे. नोकरी करायची, घाम घाळायचा पण, हाता पगार नाही. कुटुंबाची आर्थिक ओडाताण होत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या नाराजीतून आणि तणावामुळे कर्मचाऱ्यांने आत्महत्या केली आहे.

एसटी कर्मचाऱ्याला यापूर्वी कधीही असे पाऊल उचलावे लागले नाही. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी आली तरी हातात पैसे नाहीत. त्या पार्श्वभूमी अनिल परब यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. 

आत्महत्येमुळे कुटुंबाला त्याचा त्रास होतो कुटुंब रस्त्यावर येत याकडे लक्ष वेधत परब म्हणाले, की दिवाळी आधी 1 पगार मिळेल आणि दिवाळीनंतर 1 पगार मिळेल 
पूर्णपणे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. बॅंकेकडे कर्जही मागितले आहे. टप्प्या, टप्प्याने सगळ्या गोष्टी होतील.आज 1 तासात 1 पगार आणि सणाचा अनुग्रह मिळेल असे आश्वासनही अनिल परब यांनी दिले आहे. आज पुन्हा त्यांनी कर्मचाऱ्यांना थकित वेतन देण्याचे जाहीर केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख