मुख्यमंत्र्यांना 'घरा'तच धक्का; मुंबईतील शिवेसेनेच्या बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश 

मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला (Shiv Sena) धक्का बसला आहे.
 Former Shiv Sena MLA Trupti Sawant joins BJP.png
Former Shiv Sena MLA Trupti Sawant joins BJP.png

मुंबई : मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला (Shiv Sena) धक्का बसला आहे. शिवसेनेच्या विधानसभेच्या बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत (Trupti Sawant) यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. वांद्रे पूर्व या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मतदारसंघात, तृप्ती सावंत यांनी शिवसेनेचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनीच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंत याना तिकीट नाकारून, शिवसेनेने तत्कालिन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे ठाकरे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता. इथे काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी यांनी बाजी मारली होती.

दरम्यान,  2015 मध्ये आमदार बाळा सावंत यांचे निधन झाल्याने, शिवसेनेने पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधात भाजपचे खासदार नारायण राणे यांनी निवडणूक लढवली होती.  मात्र, तृप्ती सावंत यांनी बाजी मारुन विधानसभेत प्रवेश केला होता. 'मातोश्री'च्या अंगणातील जागा पटकावण्याच्या इरेने उतरलेल्या नारायण राणे यांना पोटनिवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. तृप्ती सावंत पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. 

वांद्रे पूर्व मतदारसंघाची पार्श्वभूमी

2015 मध्ये शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळा सावंत यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक झाली होती. शिवसेनेने प्रकाश सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांनाच उमेदवारी दिली होती. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या 'वांद्रे पूर्व' मतदारसंघात तिढा निर्माण झाला होता.

विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलत शिवसेनेने उमेदवारी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर दिली होती. त्यामुळे तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली होती. राज्याच्या विविध भागातील बंडोबांना थंड करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 'मातोश्री'च्या अंगणातील बंडखोरी रोखण्यात अपयशी ठरले होते.  

Edited By - Amol Jaybhaye 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com