राजकारणातील बंटी आणि बबली कोण ? सुरेश खोपडेंची फेसबूक पोस्ट व्हायरल

राजकारणात धुमाकूळ घालणारे बंटी आणि बबली कोण याकडे सुरेश खोपडे यांनी लक्ष वेधले आहे.
suresh24.jpg
suresh24.jpg

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आठ पानी पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच फोन टॅपिंग प्रकरणात अनेक राजकीय नेते, पोलिस अधिकारी यांचे नाव असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. या फोन प्रकरणावरून माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी फेसबूक पोस्ट केली आहे. राजकारणात धुमाकूळ घालणारे बंटी आणि बबली कोण याकडे सुरेश खोपडे यांनी लक्ष वेधले आहे. 

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये सुरेश खोपडे म्हणतात....

गृहमंत्र्यांनी एका कनिष्ठ अधिकाऱ्याला शंभर कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता, असा आरोप पोलिस आयुक्तांनी केला ही तशी गंभीर घटना. विरोधी पक्ष नेत्याने दखल घेणे रास्त आहे. पण त्याला काही मर्यादा? हे मीडियाच्या माध्यमातून स्वतःच न्यायाधीश बनून निवाडा करीत आहेत. 
जनतेला हातोहात फसवून आपला स्वार्थ साधणारी एक जोडी बंटी आणि बबली या नावाने चित्रपटात झळकली होती. ती अनेक क्षेत्रात दिसते.  कोरोनाचा फैलाव वाढतोय. अवकाळी पावसानं बळीराजा धास्तावलाय. पेट्रोल डिझेल भडकलय..! समस्या, समस्यात ! पण टीव्ही लावला की बंटी दिसतो. हातात कागदाच भेंडोले. 'शंभर कोटी, शंभर कोटी...याला बदला, त्याचा राजीनामा घ्या..' असा आरडाओरडा चालू असतो. त्याचं काम महत्वाचं दिसत. पण बारा कोटी माणसांना कडेही पाहायला पाहिजे ना ? आता त्यांच्यासोबत पूर्वी राज्याच्या गुप्त वार्ता विभागात काम केलेली आयपीएस अधिकारी आली. कालपासून ही बंटी बबलीची जोडी मीडियात धुमाकूळ घालते आहे. 

बंटीच्या अंगात नाना( फडणवीसी?) कळा आहेत. बबली नागपूरला सात वर्षे पेक्षा जास्त काळ होती. बंटीला राखी बांधत सुर जुळले. राखीच्या मोबदल्यात तिला पुण्याची कोतवाली/जहागिरी मिळाली. बंटीला राज्यात सत्ता मिऴावी, म्हणून बबलीने महाराष्ट्राचा सगळा गुप्त वार्ता विभाग (SID) कामाला लावला. मग तिने फोन टॅप करून खरी खोटी माहिती बंटीपर्यंत पोचविली. बंटी दिल्लीतील आपल्या फिलॉसॉफर, गाईडकडून वेळोवेळी सल्ला घेत सगळं वातावरण गढूळ बनवले आहे. त्या मंत्र्याचे, अधिकाऱ्याचे  काय करायचे ते करा त्याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही. बारा कोटी जनतेच्या इतर ही समस्या आहेत. इथले प्रश्न घटनात्मक पद्धतीने सोडवावे असेही वाटते. प्रत्येकाला आपले ध्येय साध्य करण्याचा हक्क आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com