मुंबईचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन - Former Mumbai Police Commissioner Dhanjanya Jadhav passes away | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 मार्च 2021

 धनंजय जाधव हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव उर्फ डीजे (वय 74) यांचे मध्यरात्री कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज साताऱ्यातील पुसेगाव या ठिकाणी होणार आहे. गेल्या काही दिवसापासून धनंजय जाधव यांना हृदयाच्या आजाराचा त्रास होता. त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. ते पुण्याचे माजी पोलिस आयुक्तही होते. धनंजय जाधव हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. निवृत्तीनंतर त्यांना अनेक पक्षातून आँफर होती, पण त्यांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. 

धनंजय जाधव यांचा जन्म 1947 मध्ये पुसेगाव (जि.सातारा) येथे झाला. पुसेगावातच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले तर माध्यमिक शिक्षण वाई येथे झाले. त्यानंतर त्यांनी MSc ची पदव्युत्तर पदवी घेतली. प्रथम ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रूजू झाले. 1972 ला ते युपीएससीची परीक्षा पास झाले आणि IPS म्हणून धुळे येथे रूजू झाले. त्यानंतर वर्धा, नगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलिस अधीक्षक म्हणून काम केलं. पुणे येथे  DCP म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबई येथे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली.

काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. धनंजय जाधव यांनी 2004 ते 2007 या काळात पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली. ते या पदावर 2007 ते 2008 या काळात होते आणि निवृत्त झाले निवृत्ती नंतर त्यांनी एमपीएससी बोर्डवर दोन वर्षे काम केलं. नंतर त्यांच्या मुळ गावी, पुसेगाव या ठिकाणी त्यांनी एक शिक्षण संस्था सुरु केली. शेती करत ते या संस्थेचे काम पाहायचे. 

Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख