...तर अनिल देशमुख यांच्या घरातील सीसीटीव्ही तपासा ! - Former Mumbai CP Parambir Singh’s petition in the Supreme Court | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

...तर अनिल देशमुख यांच्या घरातील सीसीटीव्ही तपासा !

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 22 मार्च 2021

१०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट देशमुख यांनी वाझे यांना दिल्याचा लेटरबाँब परमबीर सिंह यांनी नुकताच टाकला असून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच याबाबत पत्र लिहिले. या प्रकारानंतर परमबीर यांनी केलेल्या आरोपांचे खंडन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत असून परमबीर सिंह यांच्या उद्देशाबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. माझे आरोप खोटे असतील तर देशमुखांच्या घरातील सीसीटीव्ही तपासा, असे परमबीर सिंह यांनी याचिकेत म्हटले आहे. 

मुंबई:  माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी याचिका दाखल केली. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपण जे आरोप केले आहेत, त्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी सिंह यांनी या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेत आपण केलेल्या सर्व आरोपांची चौकशी करावी, त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट देशमुख यांनी वाझे यांना दिल्याचा लेटरबाँब परमबीर सिंह यांनी नुकताच टाकला असून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच याबाबत पत्र लिहिले. या प्रकारानंतर परमबीर यांनी केलेल्या आरोपांचे खंडन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत असून परमबीर सिंह यांच्या उद्देशाबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. माझे आरोप खोटे असतील तर देशमुखांच्या घरातील सीसीटीव्ही तपासा, असे परमबीर सिंह यांनी याचिकेत म्हटले आहे. 

परमबीर सिंह यांनी पदावर असताना आरोप का केला नाही. त्यांची उचलबांगडी झाल्यावरच त्यांनी हे आरोप का केले? परमबीर सिंह यांचे पत्र म्हणजे भाजपची स्क्रिप्ट असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या आरोपानंतर सिंह यांनी आता थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सचिन वाझे आणि संजय पाटील यांना कधी कधी बोलावले, याबाबत त्यांनाच विचारा, कारण त्यांना अनेकदा बोलावले होते. जर सचिन वाझे छोट्या पदावरील व्यक्ती आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणत असतील तर गृहमंत्री वारंवार का बोलावत होते? संजय पाटील यांना मी वाॅट्सअॅपवर तुम्हाला गृहमंत्र्यांनी बोलावले होते का, असे विचारले होते. मी प्रत्यक्ष जाऊन मुख्यमंत्र्यांना तोंडीच सांगितले असते तर पुरावा राहिला नसता. लेखी पुरावा राहावा या उद्देशानेच पत्र लिहिले. मेल केले म्हणून सही नव्हती, असा खुलासा परमबीर सिंह यांनी याचिकेत केला.  

दरम्यान, सचिन वाझे यांच्यावर परमबीर सिंह यांचा विश्वास होता, हे आता स्पष्ट होत आहे. वाझे खोटे बोलतील, असे मला वाटले नव्हते. मी सहीसह हार्ड कॉपी पाठवली होती, मात्र काही ठिकाणी रिसिव्ह झाली नाही, असे परमबीर सिंह यांनी सांगितले. सचिन वाझे यांनी जगाला गुडबाय असे स्टेट्स ठेवले तेव्हा परमबीर यांनी वाझे यांना बोलवून समजावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना एक डिस्प्रेनची गोळीही दिली, स्टेटस बघून परमबीर यांना उच्च पदस्थांकडून फोन आला होता, अशी माहितीही आता समोर येत आहे. 

सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर हेमंत नगराळे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. यामुळे नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी त्यांच्याकडे सोपवलेला पदभार न स्वीकारता रजेवर गेले. दरम्यान, त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत. याबाबत परमबीर सिंग यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. यामध्ये सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितलं होतं, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख