ईडीचा अनिल देशमुखांना दणका; मालमत्तेवर आणली टाच - Former Home Minister Anil Deshmukh's property worth Rs 4 crore seized from ED | Politics Marathi News - Sarkarnama

ईडीचा अनिल देशमुखांना दणका; मालमत्तेवर आणली टाच

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

याआधी अनिल देशमुख यांना ईडीने (ED) तीन समन्स बजावले आहेत.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह (Parambir Singh) यांनी केलेल्या आरोपानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने देशमुख यांची अंदाजे ४ कोटींची मालमत्ता शुक्रवारी (ता. १६ जुलै) जप्त केली आहे. त्यामुळे हा देशमुख यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.  (Former Home Minister Anil Deshmukh's property worth Rs 4 crore seized from ED)    

याआधी अनिल देशमुख यांना ईडीने (ED) तीन समन्स बजावले आहेत. देशमुख यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या विरोधात अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये 'ईडी'ला आपल्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून रोखावे, असे म्हटले होते.

हेही वाचा : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसची नव्हे तर भाजपची मते फुटतील!

देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे या दोघांना ईडी विशेष न्यायालयाने कोठडी सुनावली होती. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि विशेषकरून बदल्यांमध्ये देशमुख यांची भूमिका होती, असे त्यांचे संजीव पलांडे यांनी सक्तवसुली संचलनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात सांगितल्याचा दावा ‘ईडी’ने केला होता. या आधी अनिल देशमुख यांच्या नागपूर व वरळी  येथील घराची ईडीने झाडाझडती घेतली होती. 

दरम्यान, देशमुख यांचे वकिल कमलेश घुमरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. त्यात घुमरे म्हणाले होते की आतापर्यंत माजी मंत्री अनिल देशमुख, त्यांचा मुलगा ह्‌षीकेश, पत्नी आरती देशमुख यांना ईडीचे समन्स आलेले आहे. पण, त्यांचा मुलगा सलील देशमुख यांना अद्याप तरी समन्स आलेले नाही. आरती देशमुखांना आजच्या तारखेसाठी समन्स आले होते, असेही अ‍ॅड. घुमरे यांनी या वेळी सांगितले होते.    

हेही वाचा : आघाडी सरकारच्या विरोधात आता सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार

सचिन वाझे याने चौकशी समितीला काही ठोस उत्तरे दिलेले नाहीत. फक्त एकदा जानेवारीत अनिल देशमुख यांना भेटल्याची माहिती दिली आहे, त्यामुळे सचिन वाझे याने केलेले आरोप खोटे आहेत. सचिन वाझे याला बारवाल्यांनी 4 कोटी रुपये दिले आहेत. मात्र, ते पैसे अनिल देशमुख यांना दिले का? मग, त्यावेळी मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंह काय करत होते? परमवीर सिंह यांनी केलेले आरोपही सर्रास खोटे आहेत, असा दावा देशमुखांचे वकिल घुमरे यांनी केला होता. 

Edited By - Amol Jaybhaye   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख