EDकडून तिसरे समन्स ; अनिल देशमुख दिल्लीला रवाना ! - Former Home Minister Anil Deshmukh went to Delhi for advice | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

EDकडून तिसरे समन्स ; अनिल देशमुख दिल्लीला रवाना !

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 जुलै 2021

अनिल देशमुख यांना ईडीने तिसरे समन्स बजावले आहे.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख  Anil Deshmukh यांना ईडीने तिसरे समन्स बजावले आहे. उद्या (ता.५) ईडीच्या कार्यालयात देशमुख यांना चैाकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, अनिल देशमुख हे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. Former Home Minister Anil Deshmukh went to Delhi for advice

ईडीने यापूर्वी देशमुखांना दोन समन्स बजावले आहेत. त्याला त्यांनी आपल्या वकीलामार्फत ईडीला उत्तर दिले आहे. ईडीला सहकार्य करणार असल्याचे त्यांनी टि्वट केले. अनिल देशमुख यांनी त्यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी याचिका केली आहे. या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी देशमुख यांचे वकील अमित देसाई यानी युक्तिवाद केला. मात्र, त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाला नाही. त्यामुळे देशमुख यांच्या याचिकेवर आता सोमवारी (ता.५)  सुनावणी होणार आहे.

देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे Sanjeev Palande व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे या दोघांना ईडी विशेष न्यायालयाने येत्या ६ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि विशेषकरून बदल्यांमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांची भूमिका होती, असे त्यांचा संजीव पलांडे याने सक्तवसुली संचलनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात सांगितल्याचा दावा ‘ईडी’ने केला आहे. अनिल देशमुख यांच्या नागपूर व वरळी  येथील घराची ईडीने झाडाझडती घेतली.  मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह (Parambir Singh) यांनी केलेल्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.     

अनिल देशुख यांच्या भष्ट्रपद्धतीबाबत आपल्याला बळीचा बकरा बनविला गेले, असा आरोप परमबीरसिंह यांनी केला आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घर व कार्यालयावर छापा टाकला होता. यात त्यांना काही कागदपत्रात अफरातफर केल्याचे आढळले होते. ईडीकडून अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुखांच्या दोन्ही घरांवर छापे टाकले आहेत.  परमबीरसिंह यांनी लिहिलेल्या आठ पानी पत्रांत गृहमंत्र्यांनी वाझेला बोलावून कसे हफ्ते गोळा करायला सांगितले, हे सविस्तर लिहिले होते. याबाबत झालेल्या बैठकांना गृहमंत्र्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे हे पण उपस्थित होते, असा उल्लेख परमबीरसिंह यांनी होता.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख