...असे अनिश्चित लॉकडाऊन फक्त कोर्लई साठीच का? - Former BJP MP Kirit Somaiya criticizes Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

...असे अनिश्चित लॉकडाऊन फक्त कोर्लई साठीच का?

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 6 जून 2021

1 जूनला मी कोर्लई ग्रामपंचायत, तहसीलदार..अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि रविंद्र वायकर परिवाराच्या 19 बंगल्याचा घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी येणार असे कळविले होते.

मुंबई : कोर्लई गावात घराच्या बाहेर पडण्यासाठी तसेच गावात अन्य कोणी येण्यासंबंधात प्रतिबंध लादला गेला आहे. गावचा शेवटचा कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर 28 दिवसापर्यंत हा लॉकडाऊन राहिल असा आदेश अलिबाग प्रशासनाने 3 जूनला काढला, असल्याचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितले आहे. (Former BJP MP Kirit Somaiya criticizes Uddhav Thackeray)

हे ही वाचा : माजी सभापती मंगलदास बांदलांचा सोपवारपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम

1 जूनला मी कोर्लई ग्रामपंचायत, तहसीलदार..अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रविंद्र वायकर परिवाराच्या 19 बंगल्याचा घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी येणार असे कळविले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मला उत्तरात 4 जून रोजी गावबंदी, घरबंदीचा हा आदेश पाठविला. अशा प्रकाराने गावातला एक माणूसपण कोरोनाग्रस्त असेल किंवा 100% गाव कोरोनामुक्त होऊन 28 दिवसापर्यंत 100% लॉकडाऊन लागू करण्याचा अधिकार कोणत्या कायद्यांतर्गत आहे, असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला.   

अशा प्रकारची घर, गाव बंदी हे घटनेच्या दृष्टीने गैरकायदेशीर आहे. अशा प्रकारचा आदेश रायगड सोडता महाराष्ट्रात, देशात कुठे लागू करण्यात आला आहे त्याचे उदाहरण आम्हांला द्या, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. मी ठाकरे आणि वायकर परिवाराच्या 19 बंगल्यांच्या घोटाळ्या संबंधात येत आहे. म्हणून असा आदेश प्रशासनानी काढला, असे मला म्हणायचे नाही. परंतु गावकऱ्यांवर अशा प्रकारचा अत्याचार, सत्येचा राक्षसी उपयोग कोणत्या कायद्याखाली केला, असा प्रश्न मी ठाकरे सरकारला केला आहे, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. 

हे ही वाचा :  तलवारी, रिव्हॅाल्वर घेऊन फिरणाऱ्याची संजय राऊतांकडून पाठराखण

कोरोना उपचाराला प्राधान्य देणे ही आमचीही जबाबदारी आहे, परंतु सत्तेचा राक्षसी दुरुपयोग याचा पुनर्विचार व्हावा. लॅाकडाऊन ७ दिवसांचे असतात, असे अनिश्चित लॉकडाऊन फक्त कोर्लाई साठीच का असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख