अनिल परब यांना याचा जाब द्यावाच लागेल!

त्यांनी मुरुड ग्रामपंचायत कडे अर्ज करुन जमीन आपल्या नावावर हस्तांतरित करण्यास सांगितले आहे.
 Anil Parab .jpg
Anil Parab .jpg

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या आरोपानंतर दापोली येथील साई रिसॉर्टवर शनिवारी (ता.१२ जून) केंद्रीय पथक दाखल झाले होते. त्यांनी या परिसराची संपूर्ण पाहणी केली, हे रिसॉर्ट अनिल परब यांच्या नावाने असून त्यांना याचा जाब द्यावाच लागेल. असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.(Former BJP MP Kirit Somaiya criticizes Anil Parab) 

त्या संदर्भात सोमय्या यांनी रविवारी (ता. १३ जुन) एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हटले की ''अनील परब हे "साई रिसॉर्ट दापोली" चे मालक आहेत. त्यांनी मुरुड ग्रामपंचायत कडे अर्ज करुन जमीन आपल्या नावावर हस्तांतरित करण्यास सांगितले आहे. त्यांनी विभाश साठे यांच्याकडून मालमत्ता सर्वेक्षण क्रमांक ४४६ खरेदी केली. हे अनिल परब यांना हस्तांतरित हाऊस नंबर 1074 होते. त्यांनी मालमत्ता कर व वीज उपकर 4 हजार 680 रुपये भरला आहे. त्याचा पावती क्रमांक 40 आहे.'' असे सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्या सोबतच त्यांनी कर पावती आणि अर्जही पोस्ट केला आहे. 

दोन दिवसांपूर्वी सोमय्या यांनी ट्वीट करत पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी अनिल परब यांच्या साई रिसॉर्टला 2 दिवसात भेट देणार आहेत. मी दिल्ली येथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोस्टल झोन अॅथॉरिटीच्या प्राथमिक अहवालानुसार साई रिसॉर्ट एनडीझेड (नो-डेव्हलपमेंट झोन) मध्ये आहे. त्यामुळे साई रिसॅार्ट पाडले जाईल, असा मला विश्वास असल्याचे ते म्हणाले होते.  

केंद्रीय पर्यावर मंत्रायलयाचे अधिकारी हे साई रिसॅार्टची पाहणी करुन गेले. हे राज्यातील पर्यावरन मंत्री आदित्य ठाकरे यांना माहिती नाही का असा प्रश्ना निर्माण झाला आहे. कारण, रविवारी सकाळी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांना अनिल परब यांच्या प्रकरणांविषयी विचारले असता ते म्हणाले होते की, मी माहिती घेऊन सांगतो. त्यामुळे केंद्रीय पथकाने राज्यातील मंत्र्यांशी चर्चा केली की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

दरम्यान, सोमय्या यांच्या तक्रारीनंतर परब यांच्या साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मुरुड तालुका दापोली येथील गट क्रमांक 446 येथील साई रिसॉर्ट एनेक्सचे बांधकाम बेकायदेशीर आहे. सीआरझेड कायद्याचे (law of CRZ) उल्लंघन केले असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. फसवणूक, दस्तावेजात खाडाखोड, करत परब यांनी पदाचा दुरुपयोग केला, असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर साई रिसॅार्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकारयांनी दिले होते.  

साई रिसॉर्टचे बांधकाम करताना बिनशेती परवानगी, रस्ता, घरपट्टी आदींबाबत नियमांचे उल्लंघन करून केलेले आहे का याबाबतची वस्तूस्थिती तपासण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले होते. सोमय्या यांनी दापोली पोलिस स्टेशनला परब यांच्या साई रिसॅार्ट विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com