अनिल परब यांच्या अडचणी वाढणार; चौकशीसाठी येणार दिल्लीहून विशेष टीम!

यापूर्वी बडतर्फ केलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे अनिल परब अडचणीत आले होते.
anilParab .jpg
anilParab .jpg

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांची भेट घेत परब यांच्याबाबत तक्रार केली आहे. ही तक्रार दापोलितील परब यांच्या रिसॉर्टबाबत आहे. परब यांनी हा रिसॉर्ट काळ्या पैशातून बांधल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी केला आहे. फक्त जावडेकरच नाही तर सोमय्या यांनी याबाबत ED, CBI, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडेही तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Former BJP MP Kirit Somaiya criticizes Anil Parab)

या संदर्भात किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट केले आहे त्यामध्ये ते म्हणाले की ''पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉक डाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे ₹१० कोटीचा ( काळा पैसा) बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून पर्यावरण मंत्रालयाची विशेष टीम जाणार. ED, CBI, आयकर विभाग, महसूल मंत्रालय कडे ही मी तक्रार केली आहे'', असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. 

अनिल परब काय म्हणाले? 

सोमय्या यांच्या या आरोपांवर परब यांनीही उत्तर दिले आहे. सोमय्यांच्या आरोपांबाबत विचारले असता, परब म्हणाले, सोमय्यांच्या आरोपांना आम्ही त्या त्या प्लॅटफॉर्मवर उत्तर देऊ.

यापूर्वी बडतर्फ केलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे अनिल परब अडचणीत आले होते. त्यावेळी परब यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले होते. तसेच आपण कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही अनिल परब यांनी म्हटले होते.

अनिल परब यांनी हे आरोप फेटाळले होते. सरकारची बदनामी करण्यासाठी हे पत्र दिले आहे. सचिन वाझे कस्टडीत आहे. त्याने अजून कोणाकडे तक्रार केली नाही. अशी पत्रे बाहेर काढून सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. वाझे काही काळ शिवसेनेत होते. प्रदीप शर्मा Pradip Sharma पण शिवसेनेचे Shivsena उमेदवार होते मान्य करतो.

पण वाझेंना शिवसेनेने अस काम करायला सांगितले नाही. केंद्रीय यंत्रणाच वापर कसून शिवसेनेच्या मागे ससेमिरा लावला आहे. बदनामीचा हा लेटर बॉम्ब काढून आम्हाला काही होणार नाही. मला चौकशीला बोलवा मी दोषी असेल तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील. मी पूर्णपणे कायदेशीर लढणार मी लढाईच्या तयारीत आहे. अश्या धमक्यांना घाबरत नाही. मला टार्गेट करून मुख्यमंत्र्याना टार्गेट करण्याचा प्रयत्न, असल्याचे परब यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com