भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचं  निधन - Former BJP MLA Pascal Dhanare passes away | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचं  निधन

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

डहाणूचे भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचं कोरोनामुळे आज निधन झालं.

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणूचे भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे (Paskal Dhanare)यांचं कोरोनामुळे आज निधन झालं. रात्री अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईत हलवण्यात आलं. मात्र इथे त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर वापीमधील रेम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पास्कल धनारे  हे 2014 साली डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. डहाणुतून निवडून येणारे ते भाजपचे (BJP) प्रथम आमदार होते.भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण वरखंडे तर आज माजी आमदार पास्कल धनारे यांचं कोरोनामुळे निधन झालं.

हेही वाचा : ‘मातोश्री’चे नाव ‘लॉकडाउन’ करा... 
रत्नागिरी : मुख्यमंत्री राज्याला भिकेला लावणार, या मुख्यमंत्र्याला लॉकडाउनशिवाय काहीच दिसत नाही. त्यांचा पहिला, मधला आणि शेवटचा उपाय हा लॉकडाउनच आहे. ते लॉकडाउनशिवाय काहीच बोलत नाहीत. त्यामुळे आता ‘मातोश्री’चे नाव बदलून ‘लॉकडाउन’ करा, अशी टीका भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार नीलेश राणे Nilesh Rane यांनी केली आहे. कोरोनाचे Corona रुग्ण वाढत आहेत. आता राज्यात लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवादही साधला होता. लॉकडाउनच्या निर्णयासंदर्भात नीलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना Uddhav Thackeray लक्ष्य केले. ते म्हणाले, कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर होत आहे. मुख्यमंत्र्यांना काही कळते की नाही हेच मला समजत नाही. लॉकडाउन केले तर राज्यातील नागरिक कोरोना नव्हे तर भुकेने मरतील. लॉकडाउनचे नियम कोण तयार करते, हेच कळत नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख