सचिन वाझेने देशमुखांना वसुलीचे ४.७० कोटी दिले? 

निलंबीत वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे याने राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांना बार मालकाकडून वसूल केलेले ४ कोटी ७० लाख रुपये दिले, देशमुख म्हणजेच नंबर १होते, असे वाझेने वाझेने देशमुखांना बार मालकाकडून वसूल केलेले `ईडी`च्या चौकशीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचे कळते.
Anil Deshmukh
Anil Deshmukh

मुंबई : बडतर्फ वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे याने राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांना बार मालकाकडून वसूल केलेले ४ कोटी ७० लाख रुपये दिले, (suspended Police officer handed over 4.70cr to Ex Home minister Anil Deshmukh) देशमुख म्हणजेच नंबर १ होते, (Number one is Deshmukh only) असे वाझेने वाझेने देशमुखांना बार मालकाकडून वसूल केलेले `ईडी`च्या चौकशीत सांगितल्याची माहिती (Said ED sources) सूत्रांनी दिल्याचे कळते. 

यासंदर्भात बार मालक जया पुजारी आणि महेश शेट्टी या दोघांनीही गुडलक मनी म्हणून डिसेंम्बर महिन्यात ४० लाख वाझेला दिले होते. जे देशमुखांना दिले गेले असंही वाझेने ईडी चौकशीत मान्य केलं असे सूत्र सांगतात. ईडीने आतापर्यंतच्या तपासात ५० ते ६० करोड रुपयांच्या व्यावहारांची माहिती मिळवली आहे, असे कळते. 

यासंदर्भातील काही पैसे हे वाझे `सीआययु`मध्ये करत असलेल्या हायप्रोफाईल प्रकरणांच्या तपासादरम्यान जमवण्यात आल्याचाही ईडीला संशय आहे. ईडीने कोर्टाची परवानगी घेऊन तळोजा कारागृहात असलेल्या सचिन वाझेची चौकशी केली. ज्या चौकशी दरम्यान वाझेने या गोष्टी सांगितल्या अशी सूत्रांची माहिती आहे.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com