Virar Hospital fire:विरारमध्ये आगीत 13 कोरोना रूग्णांचा होरपळून मृत्यू  - fire at virar hospital 12 patients die | Politics Marathi News - Sarkarnama

Virar Hospital fire:विरारमध्ये आगीत 13 कोरोना रूग्णांचा होरपळून मृत्यू 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

अतिदक्षता विभागातील एससीचा स्फोट झाला.

विरार : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाच रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात तेरा रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. यात पाच महिला तर आठ पुरुषांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चैाकशीचे आदेश दिले आहे. पालकमंत्री दादा भूसे हे घटनास्थळी पोहचत आहे. नाशिक येथील रुग्णालयाची घटना ताजी असताना ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागातील एससीचा स्फोट झाला. यातील पाच जणांना दुसऱ्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते.  अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. या ठिकाणी ९० जणांवर उपचार सुरू होते.

मृतांची नावं –

१) श्रीमती. उमा सुरेश कंगुटकर, (स्त्री/वय वर्ष ६३)
२) श्री. निलेश भोईर, (पु/वय वर्ष ३५)
३) श्री. पृथ्वीराज वल्लभदास वैष्णव, (पु/वय वर्ष ६८)
४) श्रीमती. रजनी कडू, (स्त्री/वय वर्ष ६०)
५) श्री. नरेंद्र शंकर शिंदे (पु/वय वर्ष ५८)
६) श्री. जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (पु/वय वर्ष ६३)
७) श्री. कुमार किशोर दोशी (पु/वय वर्ष ४५)
८) श्री. रमेश उपयान (पु/वय वर्ष ५५)
९) श्री. प्रवीण शिवलाल गौडा (पु/वय वर्ष ६५)
१०) कु. अमेय राजेश राऊत (पु/वय वर्ष २३)
११) श्रीमती. शमा अरुण म्हात्रे (स्त्री/वय वर्ष ४८)
१२) श्रीमती. सुवर्णा पितळे (स्त्री/वय वर्ष ६४)
१३) श्रीमती. सुप्रिया देशमुख (स्त्री/वय वर्ष ४३)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख