मुंबईत जमावबंदीचा आदेश मराठा आंदोलनाला घाबरून : नीलेश राणे 

राजकीय सोयीसाठी कोरोनाचे कारण देत जमावबंदी लागू करण्यात आल्याचा आरोपराणे यांनी केला आहे.
Fear of Maratha agitation, order for curfew in Mumbai: Nilesh Rane
Fear of Maratha agitation, order for curfew in Mumbai: Nilesh Rane

पुणे : मुंबईत लावण्यात आलेले १४४ चे जमावबंदीचा आदेश कोरोनाला अटकाव करण्यासाठी नव्हे, तर मराठा आरक्षण आंदोलनाला घाबरून लावण्यात आल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. राणे यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे. 

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जावबंदी लावण्यात येत असल्याचे भासविण्यात येत असले तरी मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील मराठा समाजाच्या भावनांना उद्रेक होऊ शकतो, हे गृहीत धरून सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत होते. 

या पा‍र्श्वभूमीवर राणे यांनी सरकारवर आरोप केला आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मुंबईत आरक्षण समर्थकांकडून आंदोलन होऊ शकते. राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत येऊ शकतात, हे गृहीत धरून किंवा याबाबतची काही माहिती मिळाल्यानंतर जमावबंदीचे पाऊल उचलण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. राजकीय सोयीसाठी कोरोनाचे कारण देत जमावबंदी लागू करण्यात आल्याचा आरोप यामुळेच राणे यांनी केला आहे. 

मराठ्यांचे आरक्षण राखण्यात ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप राणे यांनी यापूर्वीच केला आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कुचराई केली. आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या विषयाकडे फारशा गांभीर्याने पाहिले नाही, असा आरोप यापूर्वीच करण्यात आले आहेत. 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या संदर्भात चव्हाण यांच्यावर आरोप केले होते. सर्वोच्च न्यायालयात अपयश आल्यानंतरदेखील आठ दिवसांत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करता आली नाही. हा संपूर्ण विषय ठाकरे सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com