फारूख अब्दुल्लांची चीनबाबतची भूमिका अयोग्य, आम्ही केंद्र सरकारच्या पाठिशी : तटकरे 

या मुद्याकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनीही अब्दुल्ला यांच्यावर टीका केली आहे.
फारूख अब्दुल्लांची चीनबाबतची भूमिका अयोग्य, आम्ही केंद्र सरकारच्या पाठिशी : तटकरे 

मुंबई : जम्मू आणि काश्‍मिरचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते फारूख अब्दुल्ला यांनी भारत सोडण्याबाबत घेतलेली भूमिका आणि 370 कलम आणि चीन याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाने संपूर्ण देशभर नाराजी आहे.

सोशल मीडियावर तर या मुद्यावरून अब्दुल्ला यांना टीकेचे धनी व्हावे लागत आहे. स्वतंत्र भारतातील अब्दुल्ला यांच्या सारख्या नेत्याला देशाने आणखी काय द्यायला हवे असा सवालही केला जात आहे. 

या मुद्याकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनीही अब्दुल्ला यांच्यावर टीका केली आहे. साम वाहिनीशी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट करीत अब्दुल्ला यांनी चीनबाबत केलेले विधान समर्थनीय नसल्याचे म्हटले आहे. 

तटकरे म्हणाले, की जम्मू-काश्‍मिरातील 270 कलम रद्द करण्याचा निर्णय झाला तेव्हा फारूख अब्दुल्ला हे सभागृहात नव्हते. हे कलम रद्द झाले आहे. मात्र चीनला पाठिंबा देणे ही त्यांची भूमिका योग्य वाटत नाही. चीनने 1962 मध्ये भारताशी युद्ध केले आहे. चीन आणि भारत यांच्यामध्ये वेळोवेळी करारही झाले आहेत. त्या त्या वेळच्या पंतप्रधानांनी तसे करार केले आहेत. त्यामुळे भारताने चीनबाबत घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देणे योग्य ठरेल असे मला वाटते. 

केंद्र सरकारने चीनसारख्या देशाला खंबीरपणाने उत्तर द्यावं, जनता आणि सर्वजन त्यांच्या पाठिशी उभे आहोत असेही तटकरे यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. 

हे ही वाचा : चीनच्या संसर्गावर मात केली : डोनाल्ड ट्रम्प

यादरम्यान ट्विटरवर डोनाल्ड ट्रम्प यांनी डॉक्‍टरांचा हवाला देत आपण कोठेही जावू शकतो अशा प्रकारची पोस्ट केल्यानंतर ट्‌विटरने तातडीने कारवाई करत ती पोस्ट वादग्रस्त असल्याचे जाहीर केले.
 
कोरोनावर उपचार करून गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प लष्करी रुग्णालयातून व्हॉइट हाऊस येथे परतले आहेत. अध्यक्षपदाची निवडणूक दोन आठवड्यावर आलेली असताना ते आता पुन्हा सक्रिय झाले आहे. 

फॉक्‍स न्यूजने म्हटले की, निवडणुकीतील लढाई लढण्यासाठी अध्यक्ष आता सक्षम झाले आहेत. ट्रम्प यांनी म्हटले की, चीनच्या धोकादायक संसर्गाला आपण हरवले आहे. आपण उच्च दर्जाच्या चाचण्या आणि परीक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com