फडणवीस म्हणतात तन्मय तर माझा दुरचा नातेवाईक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीसला पात्र नसतानाही लसीचा दुसरा डोस मिळाल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे.
 Fadnavis says Tanmay is my distant relative .jpg
Fadnavis says Tanmay is my distant relative .jpg

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीसला पात्र नसतानाही लसीचा दुसरा डोस मिळाल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. एकीकडे लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद आहेत. सर्वसामान्यांना सुविधा मिळत नसताना तन्मय फडणवीसला लस कशी मिळाली, असा सवाल काँग्रेस आणि नेटकऱ्यांनी उपस्थित करीत फडणवीसांना धारेवर धरले आहे. सोशल मीडियावर फडणवीस ट्रोल होत आहेत. 

त्यानंतर या प्रकरणावर फडणवीस यांनी लेखी निवेदन दिले आहे. त्यामध्ये फडणवीस म्हणाले की ''तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याने कोरोना लस कोणत्या निकषात घेतली, याची मला माहिती नाही. ती जर मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे असेल तर हरकत नाही. पण पात्रतेच्या निकषात नसेल, तर सर्वथा अयोग्य आहे. निकषात पात्र नसल्याने माझी पत्नी आणि मुलगी यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. आज जरी १८ वर्षांपेक्षा सर्वांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली, असली तरी नियम सर्वांनीच पाळलेच पाहिजे, हे माझे ठाम मत आहे, असल्याचे फडणवीस म्हणाले. 

दरम्यान, फडणवीसांचा पुतण्या तन्मय याने कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर काँग्रेससह अनेकांनी यावर आश्चर्य व संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसने टि्वट करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 

''४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असे असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!,'' असे टि्वट काँग्रेसने केले होते. 

धक्कादायक : बनावट आरटीपीसीआर द्वारे देत होते कोरोना अहवाल

 
''नाव… तन्मय फडणवीस, कोण… देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या. तन्मय फडणवीस ४५ वर्षांपेक्षा मोठा आहे का?, तन्मय फ्रंटलाईन वर्कर आहे का?, आरोग्य कर्मचारी आहे का? जर नसेल, तर त्याला लस दिलीच कशी काय गेली? भाजपकडे रेमडेसिव्हिर प्रमाणे लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का?,'' असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.  

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com