खासदार डेलकरांच्या सुसाइड नोटबाबत फडणवीसांनी केला हा दावा... - Fadnavis made this claim about MP Delkar's suicide note  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

खासदार डेलकरांच्या सुसाइड नोटबाबत फडणवीसांनी केला हा दावा...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 1 मार्च 2021

मोहन डेलकर यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणावरुन सुसाईड नोट सापडली आहे.

मुंबई : खासदार मोहन डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये असलेली नावे भाजप अथवा भाजपशी निगडित पदाधिकाऱ्यांची असतील तर त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा परवाना देवेंद्र फडणवीसांच्या नेत्यांनी दिला आहे का? याचे उत्तर मिळायला हवे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र वेगळाच दावा करत 'याबाबात कुणी काहीही आरोप करत असले तरी या सुसाईड नोटमध्ये कुठल्याही भाजपच्या नेत्यांची नावे नाहीत, असे  म्हटले आहे.   

''आत्महत्या कुणाचीही असो त्याची चौकशी झालीच पाहिजे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणावरुन सुसाईड नोट सापडली आहे. सुसाइड नोट सापडल्यावर चौकशी ही होतेच. कुणीही आरोप करत असले तरी या सुसाईड नोटमध्ये कुठल्याही भाजपच्या नेत्याचे नावे नाहीत'', असे फडणवीस यांनी सांगितले. 

फडणवीस म्हणाले, जर त्या सुसाइड नोटमध्ये भाजपाच्या नेत्यांचे नाव असते तर ते एवढ्यात जाहीर केले असते. कालच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. अशी स्थिती त्यांच्यावर येऊ नये. सगळे पुरावे असताना धडधडीत खोटं बोलावं लागतं तेव्हा नैतिक धैर्य येत नाही. मुख्यमंत्र्यांनी चेहर्यावर मास्क लावला असतानाही ते दिसत होत, असा टोला ही त्यांनी लगावला. 

मुख्यमंत्री काय म्हणाले होते... 

गेल्याच आठवड्यात आणखी एक आत्महत्या मुंबईत झाली आहे. तिच्याबद्दल कोणीच बोलत नाही. पूजा चव्हाण प्रकरणात सुसाईट नोट नाही, कोणी आरोप केलेले  नाही तरी राठोडांनी राजीनामा दिला आहे. पण डेलकरांची तर 13-14 पानांची सुसाईड नोट आहे. यात भाजपच्या काही उच्च पदस्थांची नावे आहेत. त्यांनाही आता राजीनामा द्यायला लावायला हवा, ठाकरे म्हणाले होते. 

या भाजपचे नेत्यांनी डेलकरांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यामागे त्यांच्या वरिष्ठांचा हात आहे का, हेसुद्धा पाहायला हवे. एका खासदाराने आत्महत्या केली. तब्बल सातवेळा एकाच मतदारसंघातून निवडून आलेला खासदार आत्महत्या करतो. इकडे आल्यानंतर दुर्दैवाने  ते म्हणताहेत की, इथले मुख्यमंत्री आणि पवारसाहेबांवर माझा विश्वास असून ते मला न्याय देतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये असलेली नावे भाजप अथवा भाजपशी निगडित पदाधिकाऱ्यांची असतील तर त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा परवाना देवेंद्र फडणवीसांच्या नेत्यांनी दिला आहे? का याचे उत्तर मिळायला हवे. डेलकरांनी आत्महत्या केल्यावर त्यांचे घर उघडे पडले. त्यांच्या पत्नी निराधार झाल्या. त्यांची बाजू कोण का मांडत नाही? त्यांच्यासाठी रस्त्यावर का कोण उतरत नाही?  डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये नावे आलेल्यांची पोलीस चौकशी करणार आहेत. परंतु तो केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी तेथील प्रशासनाला निर्देश द्यावेत की मुंबई पोलीस तपासासाठी आल्यानंतर त्यांना सहकार्य करा, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  

Edited By - Amol Jaybhaye 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख