विस्‍तार अधिकारी १० हजारांची लाच स्विकारतांना एसीबीच्‍या जाळयात - Extension officers caught accepting Rs 10,000 bribe | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

विस्‍तार अधिकारी १० हजारांची लाच स्विकारतांना एसीबीच्‍या जाळयात

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 30 जानेवारी 2021

पनवेल तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्‍तार अधिकारी नवनाथ साबळे यांना आज १० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

पनवेल : पनवेल तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्‍तार अधिकारी नवनाथ साबळे यांना आज १० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या पथकाने ही कारवाई केली. उमेश इंगोले या शिक्षकाची यवतमाळ इथं बदली झाली तेथे तो कार्यरतही झाला. 

त्यांना लास्‍ट पेमेंट स्‍लीप देण्‍यासाठी साबळे यांनी त्‍याच्‍याकडे १० हजारांची मागणी केली. म्‍हणून इंगोलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. गेले दोन दिवस एसीबीचे पथक साबळेच्‍या मागावर होते. मात्र, आज अखेर अलिबाग येथील रायगड जिल्‍हा परीषद मुख्‍यालयाच्‍या आवारात साबळे याला लाचेची रक्‍कम घेताना पकडण्‍यात आले. 

यापूर्वीही साबळे याने इंगोले यांच्‍याकडे लाचेची मागणी केली होती. त्‍यावेळी गटशिक्षणाधिकारी यांच्‍याकडे याबाबत तक्रारदेखील करण्‍यात आली होती. 

हे ही वाचा...

डॉ. अजित नवले यांना गोळ्या घालण्याची धमकी देणारा कोण?
 
नाशिक : दिल्लीतील शेतकरी आंदोलन वादात व चर्चेत अडकले असताना त्यावर प्रतिक्रीया देणा-यांतही शाब्दीक चकमकी झडू लागल्या आहेत. याच विषयावरुन फेसबुकवर डॉ. अजित नवले यांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली. दोघांनी त्याला लाईक्स दिले. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले असुन यासंदर्भात आरोप, प्रत्यारोपांची शक्यता आहे.   

यासंदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव  माजी आमदार नरसय्या आडम यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य आणि महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस, महाराष्ट्रातील एक लढाऊ आणि प्रामाणिक शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांना "नीट राहा नाहीतर गोळ्या घालीन" या शब्दांत एका इसमाने काल फेसबुकवर पोस्ट टाकली. इतर दोघा जणांनी ती लाईक केली. या तिघांपैकी किमान दोन जण तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत असे आम्ही केलेल्या तपासाअंती कळले. 

देशभर सध्या भाजपच्या केंद्र सरकारविरुद्ध सुरू असलेल्या अभूतपूर्व देशव्यापी शेतकरी आंदोलनाच्या आणि हे आंदोलन दडपून टाकण्याच्या केंद्र सरकारच्या कुटील कारस्थानाच्या पार्श्वभूमीवर धमकीची ही पोस्ट टाकण्यात आली आहे हे सूचक आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख