मुख्यमंत्र्यांची बदनामी करणाऱ्या आमदार गायकवाडांची हकालपट्टी करा.. - Expel MLA Gaikwad from the party Jogendra Kawade | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्र्यांची बदनामी करणाऱ्या आमदार गायकवाडांची हकालपट्टी करा..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 जुलै 2021

कायद्याची पायमल्ली करणाऱ्या संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करा

मुंबई : ''मातोश्री व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बदनाम करणाऱ्या आमदाराची हकालपट्टी करा, केंद्र सरकारने तयार केलेल्या कायद्याची पायमल्ली करणाऱ्या संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करा,'' अशी मागणी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे संथापक अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली. ते बुलढाणा जिल्ह्यातील चितोड़ा गावाला भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी कवाडे पत्रकारांशी बोलत होते. 

''या राज्यात फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे, मात्र चितोड़ा प्रकरणात शिवसेना आमदार संजय गायकवाड़ यांनी एक्ट्रोसिटी विरोधात बेताल वक्तव्य करीत दलितांना धमकावण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर व उद्धव ठाकरे यानी कारवाई करावी,'' अशी मागणी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. अन्यथा पिपल्स रिपब्लिकन राज्यात मोठे आंदोलन करणार,'' असा इशारा यावेळी कवाडे यांनी दिला.  

''ज्याला लोक "रामराज्य" समजतात ते खरं तर "रामभरोसे" राज्य आहे..
पुणे : उत्तरप्रदेशात पंचायत समितीच्या निवडणुकीत एका महिलेशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपवर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियातून या घटनेवरुन टिका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी योगी सरकार व भाजपवर निशाणा साधला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख