सुशीलकुमार शिंदेंच्या जावयाची मालमत्ता जप्त; ईडीचा दणका - ex chief minister's daughter's property seal    | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

सुशीलकुमार शिंदेंच्या जावयाची मालमत्ता जप्त; ईडीचा दणका

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 15 मार्च 2021

मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई 

मुंबई: दिवाळखोरीचा सामना करत असलेल्या डीएचएफएलचे प्रमोटर्स कपिल व धीरज वधावानशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मुख्यमंत्र्यांचे जावई आणि मुलीला ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) दणका दिला. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रिती राज श्राॅफ व जावई राज श्राॅफ यांची 35 कोटी 48 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती सोमवारी समोर आली.

ही कारवाई डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवान यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केली आहे. जप्त केलेली मालमत्ता अंधेरी (पूर्व), कॅलेडोनिया बिल्डिंगमधील आहे. हे वृत्त पसरताच विविध चर्चांना उधाण आले. दरम्यान, डीएचएफएल यापूर्वीही अनेक घोटाळ्यांमध्ये सामील आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने डीएचएफएलला दिलेल्या 3688 कोटी रुपयांच्या कर्जाला `फ्राॅड` घोषित केले गेले. या कंपनीची येस बँकेतील कर्ज घोटाळ्याप्रकरणीही चौकशी सुरू आहे. 

कंपनीचे प्रवर्तक वाधवान बंधू सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने संलग्न केली आहे. येस बँकेतील घोटाळ्याप्रकरणी ईडीने बँकेची माजी प्रमुख राणा कपूर व डीएचएफएलचे प्रवर्तक वाधवान यांची 2400 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केल्याची माहिती आहे.    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख