आमदार झाले तरी नगरसेवकपदाचे मानधन खिशात 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी चिटणीस खात्याकडे माहिती मागितली होती.
 Parag Shah, Raees Sheikh, Dilip Lande .jpg
Parag Shah, Raees Sheikh, Dilip Lande .jpg

मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनात नगरसेवक असलेल्या लोकप्रतिनिधींनी आमदार व खासदार म्हणून निवडूण आल्यानंतर एकाच सभागृहाचे मानधन घेणे नैतिकदृष्ट्या अपेक्षित आहे. परंतु आमदार बनलेल्या पराग शाह, (Parag Shah) रईस शेख  (Raees Sheikh) आणि दिलीप लांडे हे नगरसेवकपदाचेही मानधन महापालिकेकडून घेत आहेत. अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांना संबंधित पालिकेच्या चिटणीस विभागाकडून देण्यात आली आहे. (Even when they are MLAs, they are taking the salary of the corporator post) 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी चिटणीस खात्याकडे माहिती मागितली होती. की सद्यस्थितीत जे नगरसेवक आमदार आणि खासदार झाले आहे. ते नगरसेवक पदाचे मानधन घेततात की नाही, घेत असल्यास त्याची माहिती देण्यात यावी. चिटणीस खात्याने अनिल गलगली यांना कळविले की खासदार मनोज कोटक आणि आमदार रमेश कोरगावकर मानधन घेत नाहीत. तर आमदार रईस शेख, पराग शहा आणि दिलीप लांडे यांस दरमहा रु. 25 हजार मानधनासाठी आणि महापालिकेच्या प्रत्येक सभेकरिता रु. 150 भत्त्यासाठी अश्या केवळ चार सभांकरिता दिले जाते.

अनिल गलगली यांच्या मते राजकीय पक्षाने जे नगरसेवक आमदार आणि खासदार बनले आहे. त्या नगरसेवकपदाचा राजीनामे देणे आवश्यक होते. मात्र, दुर्दैवाने कोणत्याही राजकीय पक्षाने निर्णय घेतला नाही. अश्या परिस्थितीत कमीत कमी मानधन न घेण्याची सूचना करणे आवश्यक होते. मात्र, तीही केलेली नाही. 

रईस शेख हे समाजवादी पार्टीचे भिवंडी पूर्व मतदार संघाचे आमदार आहेत. पराग शहा हे भाजपचे घोटकोपर पूर्व मतदार संघाचे आमदार आहेत तर दिलीप लांडे हे शिवसेनेचे चांदविली मतदार संघाचे आमदार आहेत. यांनी नगरसेवक असताना विधानसभेची निवडणुक लढवली होती. त्यामुळे त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देणे अपेक्षीत होते. मात्र, सध्या ते त्या पदाचे मानधन घेत असल्याचे, माहिती अधिकारात समोर आले आहे.

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com