संबंधित लेख


मुंबई : उद्योजक व बॉलीवूड अभिनेता सचिन जोशी याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी अटक केली. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने राबविलेल्या शोध मोहिमेत...
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021
गोवा गुटखा किंग म्हणून प्रसिध्द असलेले उद्योगपती जगदीश जोशी यांचा सचिन जोशी हा मुलगा आहे.
मुंबई : भारतातून फरार झालेला उद्योगपदी विजय मल्ल्याचा गोव्यातील बंगला विकत घेणारा उद्योगपती व अभिनेता सचिन जोशीला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. ईडीने मनी लाँन्ड्रिंग प्रकरणात त्याची सुमारे सात तास चौकशी केल्यानंतर अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.
गोवा गुटखा किंग म्हणून प्रसिध्द असलेले उद्योगपती जगदीश जोशी यांचा सचिन जोशी हा मुलगा आहे. त्याच्यावर ओमकार बिल्डरशी संबंधित सुमारे १०० कोटी रुपयांच्या मनी लाँन्ड्रिंगचा आरोप आहे. फरार उद्योगपती विजय मल्ल्या याने किंशफिशर एअरलाईन्ससाठी कर्ज घेतले होते. पण हे कर्ज फेडू न शकल्याने बँकांकडून त्याच्या गोव्यातील आलिशान बंगल्यासह इतर संपत्तीचा लिलाव करण्यात आला. गोव्यातील हा बंगला सचिन जोशी याने २०१७ मध्ये खरेदी केला आहे. या बंगल्यासाठी त्याने ७३ कोटी रुपये मोजले आहेत. त्यानंतर सचिन जोशी प्रकाशझोतात आला होता.
हेही वाचा : शशिकलांचा धसका अन् पंतप्रधानांचे एमजीआर, जयललितांना नमन...
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी मागील महिन्यांतच ओमकार बिल्डरचे मालक कमल गुप्ता आणि व्यवस्थापक बाबूलाल वर्मा यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या चौकशीमध्ये सचिन जोशीचे नाव पुढे आले होते. त्यानंतर ईडीने सचिन जोशीला चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली. त्यानुसार तो रविवारी ईडीच्या मुंबई कार्यालयात हजर झाला. सुमारे सात तासांच्या चौकशीनंतर सचिन व्यवस्थित माहिती देत नसल्याच्या कारणास्तव ईडीकडून त्याला अटक करण्यात आली.
सचिनला आज स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. ईडीकडून त्याच्या कस्टडीची मागणी केली जाईल. ओमकार ग्रुप ही झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमधील मोठी कंपनी असून मुंबईमध्ये त्यांनी अनेक प्रकल्पांची उभारणी केली आहे. कमल गुप्ता व बाबूलाल वर्मा यांच्यावरही मनी लाँन्ड्रिंगचा गुन्हा दाखल आहे. मागील आठवड्यातच जोशी याचे घऱ आणि कंपनीच्या कार्यालयांमध्ये धाड टाकली होती.
सचिन जोशीने अनेक तेलगू व कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच काही बॉलीवूड चित्रपटांतही तो झळकला आहे. त्याचा प्रमुख उद्योग जेएम जोशी ग्रुप आहे.
Edited By Rajanand More