मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने छापा टाकला आहे. मनसुख हिरेन प्रकरणात निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे. Encounter specialist Pradip Sharma house raided by NIA
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी प्रदीप शर्मा हे एनआयएच्या रडारवर होते. आज सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या अंधेरी येथील घरी एआयएने छापा मारला आहे. साडेतीन तासापासून त्यांची चैाकशी सुरु आहे. निवृत्त पोलिस अधिकरी प्रदीप शर्मा यांची यापूर्वीही सलग दोन दिवस याप्रकरणी चैाकशी झाली आहे. त्यावेळी शर्मा यांच्या मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतला होता.
या प्रकरणात नुकतीच NIA नं संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक केली होती. संतोष हा शर्मांच्या जवळचा व्यक्ती असल्याचं बोललं जातं, बुधवारी पीएस फाऊंडेशनच्या दोघा जणांनाही NIA नं चौकशीला बोलावलं होतं. या प्रकरणात विनायक शिंदे आणि वाझे यांची अंधेरीत बैठक झाल्याचं बोललं जातं, त्यावेळी माजी पोलिस अधिकारी उपस्थित असल्याचं सांगितलं जातं. शर्मा यांनी ३९२ गुंडांचा एन्कांऊटर केला आहे.
मुंबई : "शिवसेनेला जशास तसे उत्तर देऊ असे म्हणणाऱ्या भाजपच्या सो कॉल्ड नेत्यांनी फक्त वेळ आणि तारीख सांगावी, आम्ही पुन्हा मैदानात येऊ," असा शिवसेनास्टाईल सणसणीत इशारा शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी दिला आहे. बुधवारी दादरच्या सेना भवनासमोर शिवसेना व भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यासंबंधी प्रतिक्रिया देणारा व्हिडियो त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्या, असे सांगणाऱ्या स्व. बाळासाहेबांची ही शिवसेना आहे. राममंदिर हा प्रत्येक हिंदूच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पण त्याच्या जमिनीच्या खरेदीत झालेल्या घोटाळ्याची वृत्ते प्रसिद्ध झाल्याचा राग भाजपकडून शिवसेनेवर काढला जातो हे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचाच प्रकार आहे, असाही टोला घाडी यांनी लगावला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.