मुंबई : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतले सर्वात महत्वाचे मंत्री आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वात विश्वासू आणि त्यांचा उजवा हात म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचा केक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निवास्थानी (वर्षा) त्यांच्या उपस्थितीत कापणार आहेत. प्रत्येक वाढदिवसाला शिंदे मध्यरात्री घरी कुटुंबीयांसमवेत केक कापतात. खासदार श्रीकांत शिंदे वडिलांच्या वाढदिवसाला हजर असतात. अनेकदा एकनाथ शिंदे आपल्या मूळगावी जाऊन वाढदिवस साजरा करतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे साधेपनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानी वर्षावर कार्यक्रम साजरा करणार आहेत.
नार्वेकरांचे मैत्रीपर्व
दरम्यान, आज एकनाथ शिंदेंच्या अभिष्टचिंतनासाठी छापल्या गेलेल्या जाहीरातीत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची जाहिरात महत्वाची मानली जात आहे. मैत्री असा शब्द वापरून नार्वेकरांनी 'सामना'च्या पहिल्या पानावर पाव पानाची जाहिरात छापून मैत्री असे लिहिले आहे. ही काय शिवसेनेतील जय विरुची जोडी आहे का काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. नार्वेकर हे आता ठाकरे यांच्याप्रमाणेच क्रमांक दोनचे नेते एकनाथ शिंदे यांच्याही जवळचे आहेत का. अशी चर्चाही आज रंगली.

